Aaditya Thackeray's Tweet: युवासेनेसाठी आजचा दिवस का आहे खास? आदित्य ठाकरे यांनी ट्विट करुन दिली 'ही' माहिती
Aaditya Thackeray | Photo Credits: Facebook

आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून पुढील नऊ दिवस म्हणजे नवरात्र. देवीच्या विविध रुपांच्या उपासनेचा आणि साधनेचा हा काळ. आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. अनेकांच्या घरोघरी घटाची स्थापना करण्यात आली आहे. मोठ्या उत्साहाचा आणि आनंदाचा हा काळ. यानिमित्ताने अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून नवरात्रीच्या शुभेच्छा देत आहेत. दरम्यान, आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनीदेखील ट्विटरच्या माध्यमातून नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच आज युवासेनेचा दहावा वर्धापन दिन असून आजचा दिवस युवासेनेसाठी का खास आहे? याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी नुकतेच एक ट्विट केले आहे. ज्यात ते म्हणाले की, आज नवरात्रीचा पहिला दिवस आणि बरोबर 10 वर्षांपूर्वी आजचा दिवस होता विजया दशमीचा! अर्थातच युवासेनेचा वर्धापन दिवस!बघता बघता ह्या 10 वर्षांत, युवासेना महाराष्ट्रातील प्रत्येक कोपऱ्यात, महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या मनात बसली. तरुण-तरुणी, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील किंवा सामाजिक न्यायहक्कांसाठीचा लढा असेल, "युवा सेवा म्हणजेच युवा सेना" हेच ब्रीदवाक्य घेऊन आपण वाटचाल करत आहोत. जरी आपण विजय दशमीच्या दिवशी युवासेनेचा वर्धापन दिन साजरा करत असू, तरी देखील आजचा दिवस महत्त्वाचा आहेच. सर्व युवासैनिकांना युवासेना वर्धापन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! युवासेनेसाठी प्रत्येक दिवस हा विजयाचाच असो ही ईश्वरचरणी आणि तमाम जनतेच्या चरणी प्रार्थना करतो, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे. हे देखील वाचा- Eknath Khadse: राष्ट्रवादी प्रवेशाबाबत एकनाथ खडसे यांनी सोडले मौन; पाहा काय म्हणाले?

आदित्य ठाकरे यांचे ट्विट-

युवा सेना ही शिवसेनाची युवा शाखा आहे. आदित्य ठाकरे युवासेनेचे प्रमुख आहेत. युवा सेनाची स्थापना 17 ऑक्टोबर 2011 मध्ये झाली आहे. आदित्य ठाकरे महाराष्ट्रातील युवा सेनाची प्रगती करून मध्य प्रदेशात तरूणांसाठी आवाज उठवण्यासाठी कुशाग्र शर्मा यांना 2019 मध्ये दिले आहे.