Prakash Ambedkar Criticizes Maharashtra Government: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नेमके कोण? उद्धव ठाकरे की अजित पवार? हे एकदा स्पष्ट करा; प्रकाश आंबेडकर यांची टीका
Prakash Ambedkar (Photo Credit: Facebook)

वाढीव वीज बिलांच्या प्रश्नांवरून महाराष्ट्रातील विरोधकांनी राज्य सरकार विरोधात आक्रमक भुमिका घेतल्याचे दिसत आहे. याच मुद्द्यावरून भाजप, मनसे यांच्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनीदेखील महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नेमके कोण आहेत? उद्धव ठाकरे की अजित पवार? असा सवाल करत प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारला खोचक टोला लगावला आहे. तसेच या सरकारने वाढीव बिलांच्या माफीवरून घूमजाव केले आहे. यामुळे ग्राहकांनी वीज बिल भरू नये. वीज जोडण्या तोडल्या गेल्या तरी वंचित बहुजन आघाडी त्या जोडण्या पुन्हा जोडून देईल, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

वीज बिल माफीवरुन या सरकारने ग्राहकांची फसवणूक केली आहे. मार्च 2020 मध्ये 51 हजार 946 कोटी इतकी थकबाकी होती. मात्र, 2014 मध्ये ही थकबाकी निम्म्याहून कमी होती. एप्रिल 2020 पासून जी बिले आली आहेत. त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. ही वाढ कुणाच्या सांगण्यावरुन केली? कशी केली ते सरकारने स्पष्ट करावे, अशीही मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. हे देखील वाचा- Lockdown Again in Maharashtra? महाराष्ट्रात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागणार? राजेश टोपे, अनिल परब, विजय वडेट्टीवार यांनी दिली 'अशी' प्रतिक्रिया

लॉकडाऊनच्या कळात महाराष्ट्रातील नागरिकांना वाढीव वीज बिल रक्कम मोजावी लागली आहे. त्यात कोरोना साथीच्या आजारामुळे सर्व नागरिकांना आर्थिक संकटाला सामोरे जावा लागत आहे. दरम्यान, वीज बिलात सूट देण्यात येईल, अशी घोषणा महाविकास आघाडीने केली होती. मात्र, त्यानंतर राज्य सरकारने वीज बिल माफीच्या घोषणे वरून घुमजाव केला आहे. तसेच सर्वसामन्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात वीजबिल पाठवून ती भरण्यासाठी सक्ती केली जात आहे, असा आरोप करत विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे.