Civil Disobedience Movement: मनसेकडून करण्यात आलेल्या सविनय कायदेभंग म्हणजे काय? संपूर्ण महिती घ्या जाणून
MNS Protest (Photo Credit: ANI)

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. मात्र, राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनलॉकला सुरुवात झाली आहे. ज्यामुळे महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने बऱ्याच गोष्टी सुरु करण्यात आल्या आहेत. दरम्यान, लोकलसेवा (Mumbai Local Trains) सुरु असून केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांनाही लोकमधून प्रवास करण्याची मुभा मिळावी म्हणून या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) रस्त्यावर उतरली. तसेच मनसेकडून सविनय कायदेभंग (Civil Disobedience Movement) करत मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे, माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी लोकलमधून प्रवास केला. यामुळे मनसे नेते अविनाश जाधव यांना नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र काही तासांनंतर त्यांची सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, सविनय कायदेभंग म्हणजे काय? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.

मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सर्वांसाठी सुरु करावी, अशा मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनादेखील पत्र लिहले होते. कोरोना काळात मनसेच्या वतीने अनेक अंदोलन केली गेली आहे. तसेच राज्यातील धार्मिक स्थळ आणि व्यायाम शाळा उघडण्याबाबत अनेक लोकांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन याविषयावर चर्चा केली आहे. हे देखील वाचा- Nilesh Rane Criticizes On Shiv Sena: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच शरद पवार यांचा गेम केला; शिवसेनेच्या टीकेला भाजप नेते निलेश राणे यांच्याकडून प्रत्युत्तर

सविनय कायदेभंग म्हणजे काय ?

नम्रपणे कायदा मोडणे व शासनाचा निषेध करणाऱ्याला सविनय कायदेभंग म्हणतात.  या अगोदर सविनय कायदेभंग महात्मा गांधीनी काही मागण्या ब्रिटिश सरकार पुढे मांडल्या होत्या. तत्कालीन ब्रिटिश सरकारने त्याच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करुन दडपशाही सुरु केली. त्यास प्रत्युत्तर म्हणून महात्मा गांधीजीच्या नेतृत्वात फेब्रुवारी 1930 साली जुलमी ब्रिटिश राजवटी विरोधात सविनय कायदेभंग चळवळीला सुरूवात झाली.

मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनाला आता रेल्वे प्रवासी संघाने पाठिंबा दर्शवला आहे. सध्या ठाण्यापुढील डोंबिवली ते कर्जत कसारा मार्गावरील लाखो प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे मनसेच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. शिवाय आम्ही आंदोलनात उतरु असंही प्रवासी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मनोहर शेलार यांनी म्हटले आहे.