Nilesh Rane Criticizes On Shiv Sena: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच शरद पवार यांचा गेम केला; शिवसेनेच्या टीकेला भाजप नेते निलेश राणे यांच्याकडून प्रत्युत्तर
निलेश राणे (फोटो सौजन्य-ट्वीटर)

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा सत्तेत आलेले भाजपचे सरकार केवळ तीन दिवसात कोसळले होते. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत हात मिळवणी करत महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली आहे. मात्र, या तीन दिवसांच्या सरकारकडून शिवसेना वारंवार भाजपला टोला लगावत असल्याचे दिसत आहे. यातच सामना अग्रलेखातून पुन्हा भाजपला चिमटा काढणाऱ्या शिवसेनेला निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रत्त्युत्तर दिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचा गेम केला, असा शब्दात त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 च्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच हालचाली पाहायला मिळाल्या होत्या. महत्वाचे म्हणजे, शिवसेना- भाजप यांच्यात मुख्यमंत्री पदावरून सुरु असलेल्या वादादरम्यान संपूर्ण महाराष्ट्राला हादरून टाकणारी माहिती समोर आली होती. राष्ट्रवादीचे नेते अजित दादा यांनी आपल्या समर्थकांसह भाजपशी हात मिळवणी करून महाराष्ट्रात पुन्हा भाजपचे सरकार आणले होते. मात्र, हे सरकार जास्त काळ टिकले नसून केवळ तीन दिवसात कोसळले होते. याच मुद्द्यावरून महाविकास आघाडीचे सरकार भाजपला चिमटा काढताना दिसत आहे. या टीकेला प्रत्युत्तर देत निलेश राणे म्हणाले आहेत की, शिवसेना नेहमी पहाटेच्या भाजप- राष्ट्रवादी शपथविधीवर टीका करते. अजित दादा पवार पहाटे पहाटे गव्हर्नर बंगल्यावर मॉर्निंग वॉकसाठी आले होते काय? त्यांच्याजवळ आमदार टिकले नाही म्हणून ते परत गेले. पवार साहेबांचा जर कोणी गेम केला असेल तर तो अजित दादा पवारांनीच केला, असा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे. हे देखील वाचा- MNS Workers Protest For Mumbai Local: मुंबईत सामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यासाठी मनसे चं सविनय कायदेभंग आंदोलन; संदीप देशपांडे यांनी केला विनापरवानगी रेल्वे प्रवास

निलेश राणे यांचे ट्विट-

‘राज्यातील काही बडे पोलीस अधिकारी सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत होते’ या विधानाची सध्या राज्यभर चर्चा आहे. हे विधान महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केल्याचे म्हटले जात होते. मात्र, पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत अनिल देशमुख यांनी त्यावर खुलासा करत ते विधान फेटाळून लावले आहे. या चर्चेवरून शिवसेनेने पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख करत टीका केली आहे.