मुंबई लोकल Photo Credit : PTI

मुंबई लोकल ही मुंबईकरांसाठी लाईफलाईन आहे. कामानिमित्त अनेक चाकरमनी पश्चिम रेल्वेने प्रवास करतात. येत्या 1 नोव्हेंबरपासून पश्चिम रेल्वेने नवं टाईमटेबल जाहीर केलं आहे. पश्चिम रेल्वेवर काही फेर्‍या वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या  फेर्‍यांमध्ये बदल 

अप दिशेला जाणार्‍या सहा नव्या गड्यांची घोषणा करण्यात आली आहे. एकूण 122 फेर्‍या वाढवण्यात आल्या आहेत यामध्ये 66 डाऊन तर 56 अप दिशेला जाणार्‍या रेल्वेच्या फेर्‍या प्रवाशांच्या दिमतीला असतील

ट्रेन 93026 डहाणू रोड ते चर्चगेट दरम्यान धावणारी रेल्वे आता 5.50 मिनिटांनी डहाणूवरून सुटणार आहे.

ट्रेन 93028 ही डहाणू - चर्चगेट गाडी संध्याकाळी 7.10 मिनिटांनी डहाणूवरून सुटणार आहे.

56 गाड्यांच्या वेळेमध्ये बदल करण्यात आले आहेत.

समान्य मुंबई लोकल्सप्रमाणेच एसी गाड्यांमध्येही बदल करण्यात आले आहेत. आता एसी लोकल मरीन लाईंस, चर्नी रोड, ग्रॅन्ड रोड, दहिसर, मीरा रोड, नायगाव आणि नालासोपारा या स्थानकावरही थांबणार आहे.

चर्चगेट -भायंदर दरम्यान धावणारी संध्याकाळी 6.51 ची लेडीज स्पेशल लोकल आता विरार पर्यंत वाढवण्यात आली आहे. पूर्वी भायंदरवरून सुटणारी ट्रेन आता विरारहून सुटणार आहे.

सकाळच्या वेळेस सुटणार्‍या लेडीज स्पेशल लोकलमध्येही बदल करण्यात आले आहेत. वसई ते चर्चगेट दरम्यान धावणारी लोकल सकाळी 9.56 ऐवजी विरारहून 9.47 वाजता सुटेल.

दिवसेंदिवस वाढणारी गर्दी पाहता मुंबई लोकलच्या फेर्‍यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. तसेच महिलांसाठी गर्दीच्या वेळेत धावणारी लेडिज स्पेशल ट्रेन देखील अधिकाधिक प्रवासांच्या सोयीसाठी वाढवण्यात आली आहे.