मुंबई मध्ये एका प्रवाशाने मराठीत बोलण्यास सांगितल्यानंतर माफीनामा लिहायला लावल्याबद्दल पश्चिम रेल्वेने रेल्वे तिकीट परीक्षकाला (TTE) निलंबित केले आहे, असे एका अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले. सोशल मीडीयामध्ये या माफीनाम्याचा फोटो वायरल झाल्यानंतर काही प्रवाशांनी आंदोलन पुकारलं आणि नंतर पश्चिम रेल्वेकडून कारवाई करण्यात आली आहे.
PTI शी बोलताना, पश्चिम रेल्वेचे chief public relations officer विनीत अभिषेक यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये सध्या टीटीई विरूद्ध चौकशी लावण्यात आली आहे. ही घटना 3 नोव्हेंबरची नालासोपारा स्थानकावरील आहे. सध्या TTE Rakesh Mourya निलंबित केले गेले आहेत. “सर्व प्रवासी, त्यांचा धर्म, भाषा किंवा प्रदेश कोणताही असो, आमच्यासाठी समान आहेत. त्यांना उत्कृष्ट सेवा देणे हे आमचे ध्येय आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.
सोमवारी सोशल मीडियावर माफीनामा पत्र समोर आल्यानंतर सुमारे 70 ते 80 प्रवाशांनी नालासोपारा स्टेशनवर आंदोलन केले आहे. अधिकार्यांच्या माहितीनुसार, टीटीईंनी अमित पाटील आणि त्यांच्या पत्नी कडे तिकीट मागितले. त्यांनी आपल्याला हिंदी समजत नसल्याचं सांगितलं. त्यांनी त्याला मराठीत बोलायला सांगितले. त्यामधून वाद सुरू झाला.
आपल्याच राज्यात आपणच समोरच्याला मराठीत बोला असं सांगायचीही सोय राहिली नाही. बरं असं कुणी सांगितलं तर ह्या परप्रांतीयांची हिंमत एवढी चेपलीय की ते असा माफीनामा भूमिपुत्रांकडून लिहून घ्यायला लागलेत, हा प्रकार अतिशय संतापजनक आहे.#Nalasopara pic.twitter.com/ee4V5S53P7
— Laconic Brains (@LaconicBrains) November 5, 2024
TTE ने या जोडप्याला Railway Protection Force च्या ऑफिसमध्ये नेले. त्यावेळी पाटील यांनी टीटीई ने आपल्याला धमकावल्याचे आणि माफीनामा लिहण्यास सांगितले असा दावा केला आहे. पश्चिम रेल्वेने आपल्या निवेदनात सर्व भाषा आणि प्रवाशांचा आदर करण्याची आपली वचनबद्धता असल्याचं म्हटलं आहे.