Mumbai Local (Photo Credits: PTI)

Mumbai Local: पश्चिम रेल्वेकडून मुंबईच्या लोकलचे वातानुकूलित मध्ये रुपांतरण करण्याचा विचार केला जात आहे. यासंदर्भात रेल्वेच्या बोर्डाने ठरवले की, उपनगरीय ट्रेन कोच या वातानुकूलित केल्या जातील. पण त्यासाठी त्यांनी मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन, मध्य आणि पश्चिम अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे. याबद्दल टाइम्स ऑफ इंडिया यांनी माहिती दिली आहे.(Petrol-Diesel Price in India: मुंबईत पेट्रोल 36, तर डिझेल 37 पैशांनी वाढले, जाणून घ्या देशातील प्रुमख शहरांतील इंधन दर)

मध्य रेल्वेकडून नुकतेच एक सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या नागरिकांना वातानुकूलित एसी ट्रेनबद्दल विचारण्यात आले. तर पश्चिम रेल्वेचे जनरल मॅनेजर आलोक कंसल यांनी म्हटले की, सर्वेक्षणात सहभागी झालेल्या लोकांनी एसी लोकल रेल्वे सेवा वाढवण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला.

मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट अंतर्गत मुंबई उपनगरातील लोकल या पूर्णपणे एसी मध्ये रुपांतर कराव्यात असे मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनचे सीएमडी रवी अग्रवाल यांनी म्हटले आहे. तर मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन येत्या काळात नव्या 283 एसी लोकची खरेदी करणार आहेत.  सध्या मुंबईत 9 एसी लोकल ट्रेन उपनगरीय भागात चालविल्या जातात. याचे तिकिट हे फर्स्ट क्लास पेक्षा थोडे अधिक आहे. पश्चिम मार्गावर पहिलीच उपनगरीय एसी लोक ही 2017 मध्ये 25 डिसेंबरला सुरु केली गेली. ही सेवा चर्चगेट ते विरार स्थानकादरम्यान चालविली जाते.(आजच्या मंत्रीमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय; पूरग्रस्त शेतकऱ्यांना 10 हजार कोटींचे अर्थसाहाय्य)

याआधी  रेल्वे अधिकाऱ्यांनी सेमी वातानुकूलिन ट्रेनसाठी फर्स्ट, सेकंड आणि एसी कोचची संख्या वाढवण्याचा विचार केला होता. मात्र आता रेल्वे बोर्डाकडून  पूर्णपणे वातानुकूलित लोकल करण्याची तयारी केली जात आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, सर्व नव्या एसी लोकल मुंबईत आणण्यात येणार आहेत. त्यानुसार उपनगरीय लोकल सेवा ही वातानुकूलित असणार आहे.