Weather Forecast | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: Pixabay)

Weather Forecast Maharashtra: भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) देशभरातील हवामानाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार, पंजाब, राजस्थान आणि इतरांसह अनेक उत्तरेकडील राज्यांमधील हवामानात लक्षणीय बदल होण्याची शक्यता आहे. पंजाब, राजस्थान आणि उत्तरेकडील इतर राज्यांमध्ये हवामान थंड राहील. दरम्यान, 18 ते 22 फेब्रुवारी या काळात पंजाबमध्ये थंड तापमान, पाऊस, गडगडाटी वादळ आणि जोरदार वाऱ्यासह गारपीट होऊ शकते.त्यासोबतच उत्तर प्रदेश, हरियाणा आदी राज्यांमध्ये हलका ते मध्य स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. इतर राज्यांमध्ये कोरडे हवामान आणि स्वच्छ सूर्यप्रकाश राहील, असेही भारतीय हवामान खात्याने (IMD) म्हटले आहे.

महाराष्ट्रात पवासाचा हलका शिडकाव

महाराष्ट्राचे हवामानही वेस्टर्न डिस्टबर्न्समुळे काहीसे बदलताना पाहायला मिळू शकते. महाराष्ट्रातील काही विभागांमध्ये आज हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. ज्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे. कोकण वगळता पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आदी विभागांमध्ये पावसाचा शिडकाव पाहायला मिळू शकतो, असा हवामनाचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. (हेही वाचा, Meteorology Units Shut Down: देशभरातील 199 जिल्हा हवामान विभाग होणार बंद; केंद्र सरकारचा निर्णय)

वेस्टर्न डिस्टर्बन्स हवामान बदलाचे कारण

वातावरणातील बदलाचे कारण वेस्टर्न डिस्टर्बन्स असल्याचे आयएमडीने म्हटले आहे. ज्यामुळे 18 ते 20 फेब्रुवारी दरम्यान पंजाबमध्ये 30 ते 40 किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. तसेच हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तरेमध्ये वादळी वारे पाहायला मिळतील. राजस्थान राज्यातही 19 आणि 20 फेब्रुवारीला काही भागात वादळ येऊ शकते ज्यात वाऱ्याचा वेग ताशी 50 किमी आहे. (हेही वाचा, Cold Wave: कडाक्याच्या थंडीपासून स्वतःचा बचाव करण्याचे सोपे उपाय (पाहा व्हिडिओ))

एक्स पोस्ट

विविध प्रदेशात हलका ते मध्यम पावसाची शक्यता

राजस्थानमध्ये 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दरम्यान, काश्मीर खोऱ्यात 18 आणि 21 फेब्रुवारी दरम्यान मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज आहे, मैदानी आणि सखल भागात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही काही निवडक भागात मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीसह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. याव्यतिरिक्त, जम्मू, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये 20 फेब्रुवारीपर्यंत गारपीट होऊ शकते. पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये 19 आणि 20 फेब्रुवारीपर्यंत गारपिटीचा धोका आहे.

एक्स पोस्ट

उत्तराखंडमध्ये रविवारपासून पावसासह बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. हवामान केंद्राने उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर आणि पिथौरागढसह अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह गारपिटीसाठी पिवळा इशारा जारी केला आहे. या जिल्ह्यांतील 3500 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या भागात बर्फवृष्टी होऊ शकते. हवामान केंद्राच्या अंदाजानुसार 18 ते 20 फेब्रुवारी दरम्यान हवामान अस्थिर राहण्याची शक्यता आहे.