या वर्षी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. गेल्या काही आठवड्यात महाराष्ट्रासहित देशातील काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यानंतर आता वर्षअखेर आणि नवीन वर्षांत पावसाची शक्यता हवामान विभागाने (Maharashtra Weather) व्यक्त केली आहे. 31 ते 1 जानेवारी रोजी राज्यातील काही भागांत पावसाचा अंदाज आयएमडीने (IMD) व्यक्त केला आहे. महाराष्ट्र, (Maharashtra) राजस्थान, (Rajasthan) पंजाबमध्ये (Punjab) पाऊस पडणार असल्याचा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वीच तामिळनाडूमधील (Tamilnadu) पूर ओसरला असताना पुन्हा पावसाच्या शक्यतेमुळे नागरिक चिंतेत आहे. (हेही वाचा - Weather Update: 'या' राज्यांमध्ये पावसाची हजेरी, उत्तर भारतात थंडीची लाट; वाचा हवामान विभागाचा अंदाज)
राज्यातील हवामानात चढ-उतार पाहायला मिळत आहे. उत्तर भारतात थंडीची लाट पसरली असून याचा परिणाम महाराष्ट्रावर दिसून येत आहे. उत्तर महाराष्ट्रातही थंडीची लाट कायम आहे. उत्तर महाराष्ट्रात तापमानात कमालीची घट पाहायला मिळत आहे. हवामान विभागाच्या खासगी संस्था स्कायमेटने पावसाबद्दल अंदाज दिला आहे. 31 ते 1 जानेवारी दरम्यान पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे नववर्षाचं स्वागत करणाऱ्या लोकांच्या आनंदावर पावसाचं विरजन पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रासह जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील काही भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच पश्चिम राजस्थान, उत्तर पदेशमधील काही भाग आणि दिल्ली एनसीआरमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.