राज्यातील थंडीचा कडाका कमी होऊन हळूहळू उन्हाचे चटके वाढू लागले आहेत. उन्हाळ्याची ही चाहूलच म्हणावी लागेल. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तापमान (Weather Update In Maharashtra) वाढत असून, पारा 30 अंशांच्या पुढे जाऊ लागला आहे. त्यामुळे काही भागात थंडीपासून दिलासा मिळताना दिसत आहे. काही भागांमध्ये मात्र दुपारच्या वेळी उन्हाच्या झळा पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला उत्तर भारतात मात्र येत्या काही दिवसात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, उत्तर भारतातही थंडीचा कडाका काहीसा उतारस लागला आहे. हवामना विभागाने म्हटले आहे की, उन्हाचा तडाखा वाढत असला तरी, फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत वाहणाऱ्या वाऱ्यामुळे थोडीशी थंडी कायम राहू शकते.
हवामान विभागाने अंदाज वर्तवत म्हटले आहे की, सिक्कीम, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मीर आणि तमिळनाडूच्या किनारपट्टीवर येत्या 22 फेब्रुवारीला म्हणजे उद्याच जोरदार वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम म्हणून वायव्य भारतातील बहुतांश भागात तापमान किरकोश प्रमाणात वाढू शकते.
दरम्यान, महाराष्ट्रातही सोलापूर, सांगली, परभणी, पुणे, जळगाव, अमरावती. चंद्रपूर, अकोला, नागपूर, वाशिम, यवतमाळ आदी जिल्ह्यांमध्ये उन्हाच्या झळा वाढत आहेत. या जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा 30 अंशाच्याही पुढे सरकला आहे. त्यामुळे रात्री आणि पहाटे पडणाऱ्या थंडीपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी, दुपारच्या झळाही वाढल्या आहेत.
रात्रीची थंडी आणि दुपारी उन अशा काहीशी काहीशी विचीत्र स्थिती पाहयाला मिळत आहे. या विचित्र स्थितीमुळे दुपारच्या वेळी रानातील पिके सुखलेली पाहायला मिळत आहेत. मुक्या प्राण्यांनाही पाण्याची अधिक गरज भासत आहे. या शिवाय रात्रीच्या वेळी थंड वारे सुटत असल्याचे पाहयाल मिळते आहे.