मान्सून (Monsoon) महाराष्ट्रात केव्हा दाखल होणार याबाबत उत्सुकता कायम आहे. साधारण जून महिना सुरु झाला की महाराष्ट्राला मान्सूनचे वेध लागतात. जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात मान्सून (Monsoon 2023) दाखल होतो. तत्पूर्वी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळतात. पण यंदा महाराष्ट्रातकाहीसे वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. राज्यातील तापमान कायम असून उष्णता वाढली आहे. राज्यातील अनेक ठिकाणी उन पावसाचा पाठशिवणीचा खेळ सुरु असल्याचे पाहयाला मिळत आहे. काही ठिकाणी ढगाळ हवामाना होते आणि पाऊस सुरु होतो. तर काही ठिकाणी आभाळातून भास्कर आग ओकत असल्याचे पाहायला मिळते. राज्यातील हे वातावरण पुढचे किमान तीन दिवस असेच राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढचे तीन दिवस राज्यात उष्णतेची लाट कायम असेल. तर, काही ठिकाणी पावसाची उपस्थिती पाहायला मिळेल. काही ठिकाण हलका ते मध्यम तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासर पाऊस बरसताना दिसेल. मान्सूनसाठी मात्र काही काळ वाटच पाहावी लागणार आहे.
दिवस उगवल्यावर साधारण दुपारपर्यंत तापमान चढे राहते. दुपार ढळताच वातावरणात मोठा बदल होऊ लागतो. काही ठिकाणी आभाळ येते. तर काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वारे वाहू लागते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात मोसमी पाऊस म्हणजेच मान्सून दाखल होईपर्यंत राज्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट पाहायला मिळू शकते. समुद्र किनारपट्टीवर उकाडा वाढण्याची शक्याता आहे. खास करुन मुंबई, कोकण पट्ट्यात आर्द्रता वाढल्याने उकाडा वाढू शकतो. (हेही वाचा, Pune Rains: पुणे शहरात गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरूवात (Watch Video))
सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदूर्ग आदी भागांमध्ये मेघगर्जना आणि विजाच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला अकोला, अमरावती, चंद्रपूर, वर्धा, सोलापूरमध्ये तीव्र उष्णता पाहायला मिळू शकेल. असा हवामानाचा अंदाज सांगतो.
दरम्यान, मान्सूनही हळूहळू वेग पकडतो आहे. खास करुन मालदीव बेटे, कौमारियन परिसर आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनची उपस्थिती पाहायला मिळत आहे. आता पुढच्या काहीच काळात मान्सून केरळमध्ये दाखल होईल. मान्सून केरळमध्ये दाखल झाला की पुढे महाराष्ट्र आणि मग भारतात निघेन. खरे तर यंदा मान्सूनला काहीसा विलंबच झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रतही मान्सून काहीसा उशीराच दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.