आगामी निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाची घौडदौड सुरु झाली आहे. तसेच प्रत्येक पक्षाकडून आपल्याला जास्त मतं कशी मिळतील याबाबत जनतेमध्ये जाऊन सभा, रॅलींचे आयोजन करताना दिसून येत आहेत. तर पुण्यातील बारामती (Baramati) येथील एका बुथ प्रतिनिधी आढाव्याच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी 43 व्या जागेवर भाजपचे (BJP) कमळ येत्या निवडणुकीत फुलणार असा दावा केला आहे. त्यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा (Amit Shah), महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) उपस्थित होते.
भाजप आणि शिवसेना (Shivsena) यांच्यामधील युतीबाबात अद्याप संभ्रम असतानाही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आम्ही 48 जागांवर निवडणुक लढवण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. त्याचसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्यामागे महाराष्ट्रच आघाडीवर असल्याचे ही फडणवीस यांनी म्हटले आहे. येत्या आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षातील उमेदवार निवडून आल्यास मोठी चुक होईल. तर गेल्यावेळी भाजपचे 42 खासदार निवडून आले होते. मात्र यंदाच्या निवडणुकीत बारामती मधील 42 वा खासदार हा भाजपाचा असेल असे कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले आहे. (हेही वाचा-नितीन गडकरी पंतप्रधान होणार? राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु)
तर मनमोहन सिंग यांच्या सरकारवेळी कोणतेही ठोस निर्णय घेण्यात आले नसल्याची टीका यावेळी फडणवीस यांनी केली. मात्र मोदींनी 21 वे शतक हे भारताच्या नावावर केले असल्याचे कौतुक फडणवीस यांनी बैठकीच्या वेळी केले आहे.