भाजप-शिवसेना (BJP-Shiv Sena) युतीत वादाचे कारण ठरलेले मुख्यमंत्री पद (Chief Minister) ते '50-50 फॉर्म्युला' (BJP-Shiv Sena 50-50 Formula) हे दोन्ही विषय आता राजकीय वर्तुळ आणि जनतेसाठी विनोदाचा विषय ठरले आहेत. विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होऊन आता आठवडा संपत आला तरी कोणत्याही पक्षाने सत्तास्थापनेसाठी राज्यपालांकडे दावा केला नाही. भाजप शिवसेना या दोन्ही पक्षांनी युतीधर्माचे पालन करत संयुत्कपणे सत्तास्थापनेचा दावा राज्यपालांकडे करणे अपेक्षीत होते. मात्र, तसे घडलेच नाही. त्यामुळे भाजप-शिवसेना यांचा मुख्यमंत्री पद, 50-50 फॉर्म्युला सोशल मीडिया आणि जनतेत थट्टेचा विषय ठरला आहे. 'आमचं ठरलंय पण, मुख्यमंत्री पदावर अडलंय', काहीही करा आठवलेंना मुख्यमंत्री करा पण सरकार स्थापन करा, असे संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
सोमवार, मंगळवार बुधवार मुख्यमंत्रीपद वाटून घ्या
मुख्यमंत्री पदावरुन सुरु असलेला भाजप-शिवसेना यांच्यातील वाद पाहून सोमवार, मंगळवार, बुधवार, भाजपचा तर गुरुवार , शुक्रवार, शनिवार शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवा, रविवार आठवलेंना मुख्यमंत्री करा, असा खिलली उडवणारा मसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही अशाच आशयाची टीका शिवसेना-भाजपवर केली आहे.
'आमचं ठरलंय पण, मुख्यमंत्री पदावर आडलंय'
'आमचं ठरलंय' या विधानाची राजकीय देन कोल्हापूरकरांची आहे. लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीतही आमचं ठरलंय हे विधान गाजलं. त्यानंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांनीही युती आणि सत्तावाटपाबाबत बोलताना हे विधान अनेक वेळा केलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या विधानाची जाहीर भाषणातून खिल्ली उडवत 'आमचं ठरलंय मात्र 124 वर अडलंय' असे म्हटले. हाच धागा पकडत आता सोशल मीडियात 'आमचं ठरलंय पण, मुख्यमंत्री पदावर आडलंय' असा उपहास केला जाऊ लागला आहे. (हेही वाचा, 'आमचं ठरलंय' ते आमचं तुटतंय? भाजपच्या फुग्याला शिवसेनेची टाचणी? काँग्रेस, राष्ट्रवादी पाहतंय दुरुन मजा)
सोशल मीडिया आणि जनतेतून उमटणारी प्रतिक्रिया पाहता भाजप, शिवसेना या दोन्ही पक्षांच्या जागा वाढण्यास कारण ठरलेला '50-50 फॉर्म्युला'चा आता या दोन्ही पक्षांच्या टिंगलीचा विषय झाल्याचे पाहायला मिळते. विशेष म्हणजे अलिकडे विरोधी पक्ष आणि सत्तास्थापनेचा दावा करणाऱ्या पक्षांची विधानेही सोशल मीडियात व्हायरल होत असल्याल्या विधांनाना परस्परपुरक असलेली पाहायला मिळू लागली आहेत.