मुंबई: भरधाव कारची तरुणीला धडक; जोगेश्वरी येथील घटना

Car rammed a girl in Jogeshwari :मुंबई येथील जोगेश्वरी परिसरात एक भीषण रस्ता अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. एका भरधाव कारने रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या दरुणीला जोराची धडक दिली. कारची धडक इतकी तीव्र होती की, तरुणी जागेवरुन उडून काही अंतरावर असलेल्या झाडावर पडली. तसेच, याच भरधाव कारही याच झाडावर जाऊन आदळली. अपघातानंतर तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती गंभीर आहे. तसेच, ती कोमात असल्याचेही समजते. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर दुर्गानगर येथे ही घटना 30 डिसेंबर या दिवशी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडली.

प्राप्त माहितीनुसार, अपघातात जखमी झालेल्या तरुणीचे नाव सायली राणे असे आहे. अपघात घडला तेव्हा सायली क्लासमधून घरी निघाली होती. ती रस्त्याने एका बाजून निघाली होती. दरम्यान, पाठिमागून भरधाव वेगात आलेल्या एका कारने तिला धडक दिली. कारची धडक इतकी भयानक होती की, या धडकेमुळे सायली जागेवरुन सुमारे 8 ते 10 फुट उंच हवेत उडाली आणि पुढे जाऊन फुटपातवर आदळली. (हेही वाचा, ठाणे: प्रियकराच्या मदतीने बायकोने केली पतीची हत्या, मृतदेह हॉस्पीटलमध्ये नेऊन रचला अपघाताचा बनाव)

चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघात चालकही गंभीर जखमी झाला आहे. चालकाचे वय 50 ते 60 वर्षांदरम्यान आहे. एमआयडीसी पोलिसांनी गाडी ताब्यात घेत पुढील तापासही सुरु केला आहे.