बनावट सॅनिटाझर जप्त (PC - Twitter)

पालघर (Palghar) जिल्ह्यातील एका केमिकल कंपनीवर वाडा पोलिसांनी (Wada Police) छापा टाकला असून FDA च्या परवानगीशिवाय तयार केलेला कच्चा माल आणि हँड सॅनिटायझर (Hand Sanitizer) जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या सॅनिटायझरची किंमत सुमारे 19 लाखांहून अधिक आहे. पोलिसांनी या प्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल केला आहे.

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी हातांना सॅनिटाझर लावण्याचा सल्ला सरकारकडून दिला जात आहे. त्यामुळे राज्यातील अनेक उत्पादकांनी बनावट सॅनिटाझर बनवण्यास सुरूवात केली आहे. तसेच अनेक ठिकाणी मुळ किंमतीपेक्षा जास्त दरात सॅनिटाझर विकल्याचे प्रकारही उघडकीस येत आहेत. परंतु, सरकारची यावर कडक नजर आहे. (हेही वाचा - Coronavirus: शुत्रू कसाही असो, युद्ध हे युद्ध असतं: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांनी रचली कविता; पहा व्हिडिओ)

दरम्यान, आतापर्यंत राज्यात अनेक ठिकाणी बनावट सॅनिटाझर बनवणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. बाजारात सॅनिटायझरचा तुटवडा निर्माण झाला असल्याने अनेकजण बनावट सॅनिटायझरची विक्री करत असल्याचे समोर आले आहे. आरोग्य आणि पुरवठा मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी सॅनिटायझरची वाढती मागणी पाहता त्याचा तुटवडा भरून काढला जाईल, असे सांगितले होते. तसेच मुळ किंमतीपेक्षा जास्त पैशांत सॅनिटाझर विकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असंही शिंगणे यांनी स्पष्ट केलं होतं.