 
                                                                 Coronavirus: काही शत्रू डोळ्याने दिसत नाहीत,लपून वार करतात. त्यांच्या हातात शस्त्र नसतं, तरीही ते घातक असतात. पण शत्रू कसाही असो, युद्ध हे युद्ध असतं आणि तुमची साथ असेल तर आपण ते जिंकणार, असा विश्वास व्यक्त करत एका पोलिस हवालदाराने कोरोना विरोधच्या युद्धाच्या सद्यस्थितीवर एक कविता (Poem) रचली आहे. दिलीप नामदेव धायगुडे असं या पोसिस हवालदाराचं नाव आहे.
सध्या संपूर्ण जगाला कोरोनाने विळखा घातला आहे. भारतात देखील कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांचे लॉकडाऊन घोषीत केले आहे. केंद्र तसेच राज्य सरकारकडून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केलं आहे. परंतु, तरीदेखील लोक सरकारच्या सुचनांचे उल्लंघन करत आहेत. त्यामुळे दिलीप धायगुडे यांनी या गंभीर विषयावर भाष्य करणारी कविता लिहिली आहे. (हेही वाचा - Coronavirus: खाकी कपड्यावाल्या तुझे कर्ज कसे फेडू? म्हणत पोलिसांच्या कर्तव्याला भावनात्मक कवितेतून सलाम (Video))
काही शत्रू डोळ्याने दिसत नाहीत,लपून वार करतात. त्यांच्या हातात शस्त्र नसतं, तारीही ते घातक असतात.पण शत्रू कसाही असो, युद्ध हे युद्ध असतं आणि तुमची साथ असेल तर आपण ते जिंकणार
युद्धाच्या सद्यस्थितीवर योध्यानेच केलेली ही एक कविता #WarAgainstVirus @CMOMaharashtra @AnilDeshmukhNCP pic.twitter.com/jxm4mxHtny
— Maharashtra Police (@DGPMaharashtra) April 7, 2020
या कवितेत कोरोना व्हायरसची दाहकता सांगण्यात आली आहे. माणुस माणुसकी विसरत आहे. सरकारच्या सुचनांना डल्ला मारत आहे. डॉक्टर, जवान, पोलिस रात्रंदिवस राबतो आहे, या आशयाच्या कवितेच्या ओळी मन शुन्न करून टाकतात. सध्या सोशल मीडियावर दिलीप धायगुडे यांची कविता व्हायरल होत आहे. महाराष्ट्र पोलिस या अधिकृत ट्विट हँडलवरून ही कविता शेअर करण्यात आली आहे.
आता बाजारात मिळतोय 'कोरोना' केक ; पाहा काय आहे खासियत : watch Video
यापूर्वीही पोलिसांनी नागरिकांना वेगवेगळ्या माध्यमातून घराबाहेर न पडण्याचा संदेश दिला आहे. तेलंगणा पोलिसांनी कोरोना प्रमाणे दिसणारे हेल्मेट घालून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं होतं. तसेच महाराष्ट्रातील एका पोलिसांनी 'जिंदगी मौत न बन जाऐ', हे गाणं म्हणत लोकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं होतं.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
