Coronavirus: खाकी कपड्यावाल्या तुझे कर्ज कसे फेडू? म्हणत पोलिसांच्या कर्तव्याला भावनात्मक कवितेतून सलाम (Video)
प्रतीकात्मक फोटो | (PTI photo)

देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून त्याच्या रुग्णांसह मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सरकारकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. ऐवढेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला लॉकडाउनच्या काळात कोरोनाच्या विरोधात लढा द्यायचे आहे असे आवाहन नागरिकांना केले आहे. तर दुसऱ्या बाजूला कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर्स, नर्स आणि अन्य वैद्यकिय कर्मचारी दिवसरात्र काम करत आहे. तसेच लॉकडाउनच्या काळात नागरिकांना घरी बसण्याचे आवाहन करण्यासाठी पोलीस रस्त्यावर गस्त घालत आहेत. संचारबंदीच्या काळात ही पोलीसांकडून दिवसरात्र काम केले जात असून त्यांच्या कर्तव्याला सलाम करणारी एक कविता सध्या सोशल मीडिया व्हायरल होत आहे. या कवितेतून 'खाकी कपड्यावाल्या तुझे कर्ज कसे फेडू?' अशी भावना व्यक्त करण्यात आली आहे.

सरकारने संपूर्णपणे लॉकडाउनचे आदेश दिल्याने नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई आहे. मात्र अत्यावश्य सेवासुविधांसाठी कार्यरत असलेल्यांना अडवू नये असे ही सांगण्यात आले आहे. याच पार्श्वभुमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढू नये म्हणून पोलीस रस्त्यांवर 24 तास गस्त घालत असून नागरिकांना घरीच थांबण्याचे आवाहन करत आहे. पोलिसांच्या या कार्याचे मोल अधिक असून त्यासाठी शब्द अपुरे आहेतच. पण ट्वीटवर सध्या पोलीस बजावत असलेल्या त्यांच्या कर्तव्याची जाण ठेवत एक कविता शेअर करण्यात आली आहे. या कवितेत 'रात्र दिवस राबतो, तुला येत नाही रडू, खाकी कपड्यावाल्या तुझे कर्ज केस फेडू?' अशी भावना व्यक्त केली असून अंगावर काटा येणारे कवितेचे बोल आहेत.('अफवा नको जागरूकता पसरवा' मुंबई पोलिसांचे नागरिकांना आवाहन)

यापूर्वी सुद्धा सोशल मीडियात एक चिमुकली आपल्या पोलीसधाऱ्या वडिलांना बाहेर कोरोना आहे म्हणून जाऊ नका असे म्हणत विनवणी करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. पण खरंच पोलिस आपले कर्तव्य कोरोनाच्या परिस्थितीच नाही तर अन्य सण उत्सवाच्या वेळी सुद्धा योग्य पार पाडत असतात. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी घराबाहेर जाणे टाळा आणि पोलिसांसह सरकारच्या नियमांचे पालन करा असे वेळोवेळी सांगण्यात येत आहे.