'अफवा नको जागरूकता पसरवा' मुंबई पोलिसांचे नागरिकांना आवाहन
Mumbai Police (Photo Credit: PTI)

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण जगात थैमान घातला आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. कोरोना विषाणूमुळे जगभरात आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, लाखो लोकांना याची लागण झाल्याचे कळते आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूबाबत खोट्या माहितीचा (Fake News) प्रसार केला जात असल्याचे बातम्या आपल्या कानावर पडत आहेत. संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट वावरत असताना नागरिकांनी अफवा नको तर, जागरूकता पसरावी, असे आवाहन मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) ट्वीटरच्या माध्यमातून केले आहे. कोरोना विषाणूने वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्र आणि राज्य सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्सफरन्सद्वारे देशातील सर्व मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या बैठकीत नेमका कोणता निर्णय घेण्यात येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकार सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात संचारबंदी असूनही अनेक ठिकाणी लोक खरेदी किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर पडत आहेत. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. दरम्यान, दक्षिण मुंबईतील आतापर्यंत एकूण 191 परिसर सील करण्यात आले आहेत, यात मलबार हिल, वाळकेश्वर, पेडर रोड, बेलासीस रोड, वरळी कोळीवाडा आणि प्रभादेवीचा समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कवितेच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन केले आहे. हे देखील वाचा- Coronavirus Update: महाराष्ट्रात आणखी 3 नवे रुग्ण आढळले; राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 338 वर

मुंबई पोलिसांचे ट्वीट-

जगभरात कोरोनाबाधीतांची संख्या 9 लाख 35 हजार 584 वर पोहचली आहे. यांपैकी 47 हजार 206 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 94 हजार 260 रुग्ण बरे झाल्याची माहिती समोर आली आहे. आता भारतही कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकत चालला असल्याची चिन्ह दिसू लागली आहे. भारतात आतापर्यंत एकूण 1 हजार 834 कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यांपैकी 52 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 144 लोक बरे झाले आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या 338 वर पोहचली आहे. यात 13 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 41 रुग्ण कोरोना विषाणूच्या जाळ्यातून बाहेर आल्याचे समजत आहे.