Devendra Fadnavis (Photo Credit - Twitter)

गेल्या दोन दिवसांपासून विदर्भात (Vidarbha) पावसाचा हाहाकार सुरु आहे. विदर्भातील विविध जिल्ह्यांना महापुराचा फटका बसला आहे. विदर्भात सरासरीपेक्षा 180 टक्के अधिक पावसाची नोंद झाली. वर्धा (Wardha), अमरावती (Amravati), चंद्रपूर (Chandrapur), गडचिरोली (Gadchiroli), बुलडाणा (Buldhana), यवतमाळ (Yavatmal), भंडारा (Bhandara) या जिल्ह्यांमध्ये महापूराची स्थिती निर्माण झाली आहे. पुढील दोन दिवस आणखी संपूर्ण विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे अमरावती जिल्यातील 30 तर तर वर्धा जिल्ह्यातील  42 गावांचा संपर्क तुटला आहे. मदत आणि बचावकार्यासाठी खेडोपाडी एनडीआरएफ (NDRF) आणि एसडीआरएफच्या (SDRF) तुकड्या दाखल झाल्या आहेत. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज वर्धा जिल्ह्याला भेट दिली आहे. पूरग्रस्त भागांची त्यांनी पाहणी केली आहे.

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट (Hinganghat) तालुक्याला भेट दिली. शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करत त्यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. संबंधीत पूर परिस्थितीचा आढावा घेवून देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली की, 'पूरस्थितीचा पाहणी करता मुसळधार पावसामुळे शेती पाण्याखाली गेली आहे आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. दुबार पेरणीही पाण्याखाली गेली असुन पुन्हा पेरणी करणं अशक्य आहे. ही परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना योग्य मदत देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भातील शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे. (हे ही वाचा:-Maharashtra Politics: आज जी महाविकास आघाडी झाली ती 2009 मध्येच झाली असती पण.... शिवाजीराव आढळराव पाटलांचा गौप्यस्फोट)

 

अडीच वर्ष विरोधीपक्ष नेता म्हणून काम केल्यानंतर आपल्या नेता राज्याचा उपमुख्यमंत्री झाल्यामुळे विदर्भ वासियांच्या देवेंद्र फडणवीसांकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. तरी होम ग्राउंडवर (Home Ground) जाऊन देवेंद्र फडणवीसांनी दौरा केल्या नंतर लवकरच राज्य सरकार तर्फे शेतकऱ्यासह पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदतीची घोषणा केल्या जाऊ शकते. तसेच विदर्भ वासियांवरील अतिवृष्टीचे संकट टळले नसून हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.