Vegetables Rate Increased: गृहिणींचे बजेट कोलमडले, वाढत्या उष्णतेमुळे एपीएमसी मार्केटमध्ये आवक घटल्याने भाजीपाला महागला
Photo Credit -X

Vegetables Rate In APMC Market: उन्हाच्या तडाख्याचा फटका भाज्यांना होत आहे. परिणामी काही भागात पाण्याअभावी भाज्या सुकून जात आहेत. काही ठिकाणी गारपीठीमुळे भाज्या खराब होत आहेत. एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये आवक (Vegetables Rate) घटल्यामुळे भाजीपाल्याचे दर वधारले आहेत. सध्या एपीएमसी मार्केटमध्ये (APMC market)फक्त 500 गाड्यांची आवक होत आहे. त्याउलट मागणी जास्त आहे. पुरवठा कमी झाल्याने भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत. त्यामुळे गृहिणींची चिंता वाढली आहे. भाज्यांचे दर वाढल्याने त्यांचे किचन बजेट कोलमडले आहे.

काकडी आणि पालक, मेथी, मुळा, कोथिंबीर,वाटाणा, फरसबी, फ्लॉवर, शेवगा शेंग, घेवडा यांचे दर वधारले आहेत. आणखी काही दिवस दर चढेच राहणार असल्याचा अंदाज व्यापारी वर्गातून व्यक्त करण्यात (Vegetables Rate In APMC market) येत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या ताटात आवडीच्या भाज्या काहीशा प्रमाणात कमी झाल्या आहेत. आठवडाभर आधी डाळींचे दर देखील गगनाला भिडले होते. त्यासोबतच भाजीपाला देखील महाग झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहे.

या आठवड्यात एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांचे (Vegetables) दर हे फरसबी 100 रूपये प्रतिकिलो, घेवडा 40 रूपये प्रतिकिलो, काकडी 20 रूपये प्रतिकिलो, शेवगा शेंग 30 रूपये प्रतिकिलो, (Vegetables Rate Update) वाटाणा 100 रूपये प्रतिकिलो, फ्लोवर 16 रूपये प्रतिकिलो, गवार 35 रूपये प्रतिकिलो, ढोबळी मिरची 35 रूपये प्रतिकिलो, भेंडी 38 रूपये प्रतिकिलो, चवळी 26 रूपये प्रतिकिलो, सुरण 60 रूपये प्रतिकिलो, कोथिंबीर 15 रूपये जुडी, मेथी 15 रूपये जुडी, पालक 10 रूपये जुडी, कांदा पात 18 रूपये जुडी, मुळा 50 रूपये प्रतिकिलो आहेत.

हेच दर 15 दिवसांपूर्वीचे फरसबी 33 रूपये प्रतिकिलो, घेवडा 28 रूपये प्रतिकिलो, काकडी 12 रूपये प्रतिकिलो, शेवगा शेंग 25 रूपये प्रतिकिलो, वाटाणा 65, फ्लोवर 9 रूपये प्रतिकिलो, गवार 40 रूपये (Vegetables Rate Todays) प्रतिकिलो, ढोबळी मिरची 37 रूपये प्रतिकिलो, भेंडी 27 रूपये प्रतिकिलो, चवळी 20 रूपये प्रतिकिलो, सुरण 55 रूपये प्रतिकिलो, कोथिंबीर 15 रूपये जुडी, मेथी 10 रूपये जुडी, पालक 10 रूपये जुडी, कांदा पात 12 रूपये जुडी, मुळा 40 रूपये प्रतिकिलो असे होते.