
Vardha Shocker: घराच्यांनी प्रेमाला विरोध केल्याने एका प्रेमयुगलांनी आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. ही घटना वर्धा जिल्ह्यातील पारडी येथे घडली आहे. दोघांनी पारडी येथील एका विहिरीत उडी मारत आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणेतील मुलगी ही अल्पवयीन असल्याचे समोर येत आहे. हर्षल वाघाडे (वय वर्ष २३) असं तरुणाचे नाव आहे.( हेही वाचा- शिवडीत 40 वर्षीय महिलेची दगडाने ठेचून हत्या, आरोपीला अटक)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही पारडी येथील रहिवासी आहेत. दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र, त्यांच्या प्रेमाला घरातून विरोध असल्याने दोघांनी टोकाचे पाऊल उचलले. दोघे ही घरातून पळून गेले होते. घरांचा या गोष्टीची माहिती मिळताच, दोघांचा ही शोध घेतला. या प्रकरणी घरांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवला. घरांच्या कुटुंबियांनी आणि पोलिसांनी दोघांचा शोध घेण्यास सुरुवात केली. शोधता शोधता पोलिसांना दोघांचा मृतदेह हा पारडी येथील जंगलातील विहिरीत आढळून आला. दोघांन्ही विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचे पोलिसांना माहिती मिळाली.
या घटनेची माहिती पोलिसांनी कुटुंबियांना दिली. दोघांनी आत्महत्या केल्याचे वृत्त गावात पसरताच, खळबळ उडाली. हर्षल आणि अल्पवयीन मुलीचे काही वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरु होते, अशी माहिती गावकऱ्यांकडून मिळाली. दोघांन्ही लग्नाचा विचार केला होता. परंतु कुटुंबियांना याला नकार दिला.