Gun Shot | Pixabay.com

एनसीपी चे माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांच्या खूनाने पुन्हा पुणे शहर हादरल्यानंतर आता या प्रकरणात नवा खुलासा झाला आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार वनराज यांचा खून कौटुंबिक वादातून झाला आहे आणि त्याच्या खूनामागे त्याच्याच बहिणी आणि मेव्हण्याचा हात आहे. दरम्यान वनराज यांचे वडील बंडू आंदेकर (Bandu Andekar) यांनी पोलिसात त्याची तक्रार दिली आहे. समर्थ पोलिस स्टेशन (Samarth Police Station) मध्ये त्यांनी दिलेल्या फिर्यादी वरून वनराजच्या दोन बहिणी आणि मेव्हण्यांच्या सांगण्यावरून हा खून झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यामध्ये त्यांना अटकही करण्यात आली आहे.  नक्की वाचा: Pune Vanraj Andekar murder: पुण्यातील माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या,आरोपी फरार. 

बहिणींनी सुपारी दिल्याचा वडिलांंचा खळबळजनक दावा

पुण्याच्या नाना पेठेमध्ये आंदेकर यांचा जावई गणेश कोमकर यांचं दुकान होतं. मात्र महापालिकेने अतिक्रमण कारवाई मध्ये ते पाडलं आणि घरात वादाला सुरूवात झाली होती. यानंतर वनराज यांच्या बहिणीने त्याला 'तुला पोरं बोलवून ठोकतेच' असं म्हणत धमकी दिली होती. पुण्यात काल वनराज यांच्यावर 5 राऊंड फायरिंग झाले. त्यानंतर कोयत्याने वार झाले. यानंतर जखमी अवस्थेमध्ये त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. एका घरगुती कार्यक्रमानंतर कुटुंबातील एका सदस्यासोबतच तो बाहेर पडला होता. वनराज सोबत कुणी नसल्याचं पाहून मारेकर्‍यांनी डाव साधला आणि यामध्ये वनराज यांचा मृत्यू झाला. शिवसेना शहर प्रमुख रामभाऊ पारेख यांच्यावर अ‍ॅसिड हल्ला प्रकरणामध्ये यापूर्वी गणेश कोमकर यांचे नाव आले आहे.

पोलिस सध्या वनराज यांच्या मारेकर्‍यांच्या मागावर आहेत. वनराज यांच्या खूनासाठी 5-6 बाईक घेऊन 12-15 जणांची टोळी आली होती. त्यांनी वनराज वर हल्ला केला. 10 आरोपी असल्याचं समोर आले असून 4 जण सध्या पोलिस ताब्यामध्ये आहेत.