Prakash Ambedkar | (Photo Credits: Facebook)

Maharashtra Assembly Election 2019: आगामी विधानसभा निडवणूक 2019 मध्ये शिवसेना ( Shiv Sena) - भाजप (BJP) युती आणि काँग्रेस ( Congress) -राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांच्या आघाडी झाली. दरम्यान, लोकसभा निवडणूक 2019 मध्ये मतांच्या टक्केवारीत महत्त्वाची जागा निर्माण केलेली वंचित बहुजन आघाडी ही विधानसभा निवडणुकीत काय भूमिका घेणार याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत हातमिळवणी करणार की, शिवसेना भाजप युतीला अप्रत्यक्ष मदत करणार याबाबत अनेक चर्चा, तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत. दरम्यान, प्रसारमाध्यमांनी वृत्त दिले आहे की, आगामी निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ही स्वबळाचा झेंडा फडकविण्याची शक्यता आहे.

एबीपी माझा या वृत्तवाहिनेने दिलेल्या वृत्तात वंचित बहुजन आघाडी ही स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, प्राप्त माहिती अशी की, विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने चाचपणी सुरु केली असून, उमेदवारीसाठी इच्छुकांच्या मुलाखतीही सुरु केल्या आहेत. दरम्यान, वंचित बहुजन आघाडी प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, काँग्रेसने वंचित आघाडीला जर 40 जागांवर निवडणूक लढविण्यासाठी तयारी दर्शवली तर, वंचित आघाडी काँग्रेससोबत जाण्यास तयार आहे. दरम्यान, वंचित आघाडीचे प्रवक्ते गोपिचंद पडळकर यांनी मध्यंतरी थेट काँग्रेसलाच 40 जागांची ऑफर केल्याने खळबळ उडाली होती. (हेही वाचा, बहुजन वंचित आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर; लक्ष्मण माने यांनी मागितला अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा राजीनामा)

दरम्यान, कोणासोबत आघाडी करणार किंवा नाही या प्रश्नाचे उत्तर बाकी असतानाच वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी उमेदवारीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घ्यायलाही आघाडीने (वंचित बहुजन) सुरुवात केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, वंचित बहुजन आघाडीकडून विदर्भातील उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण केल्या आहेत. येत्या 30 जुलै पर्यंत वंचित बहुजन आघाडी उमेदवरांची पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे.