Sanjay Raut on Prakash Ambedkar: अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर निरंतर चर्चा करावे असे व्यक्तीमत्व- संजय राऊत
Sanjay Raut and Prakash Ambedkar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाविकासआघाडीचे लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) च्या पार्श्वभूमीवर जागावाटप जवळपास निश्चीत झाले आहे. ज्या काही दोन-चार जागा राहिल्या आहेत. त्याबातब लवकरच तोडगा काढला जाईल, असे सांगतानाच वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aaghadi) आजदेखील मविआचा एक भाग आहे. त्यामुळे VBA चे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्याशी चर्चा सुरु आहे. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हे निरंतर चर्चा करत राहावी असे व्यक्तीमत्व आहे. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्हालाही उर्जा मिळते, असे खोचक वक्तव्य शिवसेना (UBT) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. ते मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

महाविकासआघाडीच्या वतीने केली जाणारी वक्तव्ये, दावे आणि अनेक प्रस्ताव प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने फेटाळून लावले आहेत. असे असताना चर्चेसाठी पुन्हा नवे प्रस्ताव दिले जात आहेत. चर्चेचे गुऱ्हाळ अद्यापही कायम आहे. त्यामुळे वंचित आघाडी खरोखरच महाविकासआघाडीचा घटक आहे किंवा नाही? याबात अद्यापही संभ्रम आहे. खास करुन हा संभ्रम वंचित बहुजन आघाडी आणि महाविकासआघाडी अशा दोन्हींच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे हा संभ्रम दूर करण्यासाठी आणि स्पष्ट चित्र पुढे येण्यासाठी दोन्ही बाजूचे नेते नेमका कोणता निर्णय घेतात याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, Sanjay Raut on Mahayuti: 'गुलामांच्या तोंडावर तुकडे फेकले जातात', संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे, अजित पवार गटावर टीका)

महाविकासआघाडीने आगोदर दिलेल्या तीन जागांचा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडने फेटाळून लावला आहे. आम्हाला सन्मानजनक आणि जिंकता येतील अशाच जागा द्या, यावर वंचित आघाडीचा आतापर्यंतचा भर राहिला आहे. त्यामुळे महाविकासआघाडीच्या नेत्यांनाही वंचीत बहुजन आघाडीच्या मनात नेमके काय आहे याबाबत अजूनही स्पष्टता आली नाही. दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडीस लोकसभेच्या 5 जागा देण्यापर्यंत महाविकासआघाडीत विचार झाल्याचे समजते. त्यामुळे असा काही नवा प्रस्ताव आला तर त्याबातब अॅड. प्रकाश आंबेडकर नेमका काय निर्णय घेतात याबाबतही उत्सुकता आहे. (हेही वाचा, Sanjay Raut Criticized BJP: आज या देशात कोणीही सुरक्षित नाही, कोणालाही अटक होऊ शकते; संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा)

मविआचे निर्णय महाराष्ट्रातच!

दरम्यान, संजय राऊत  यांनी जागावाटपावरुन महायुतीला जोरदार टोला लगावला आहे. महाविकासआघाडीमध्ये असलेल्या प्रत्येक पक्षाला निर्णयाचे स्वातंत्र्य आहे. ते आपापले मुद्दे मांडतात. त्यावर विचार होतो. जागावाटपाच्या चर्चेसाठी आम्ही सर्व निर्णय महाराष्ट्रातच घेत असतो. कधी उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान 'मातोश्री' येथे तर कधी शरद पवार यांचे निवास्थान 'सिल्वर ओक' या ठिकाणी चर्चा होते. गरज पडल्यास आम्ही अन्य ठिकाणीही चर्चेस बसतो. मात्र, आमचे निर्णय आम्ही महाराष्ट्रातच घेतो. जागावाटपाच्या चर्चेसाठी आम्हाला एखाद्या पक्षाच्या पाठिमागे फिरावे लागत नाही तसेच दिल्लीत जाऊन नेत्यांच्या घराबाहेर लॉनवर रुमाल टाकून बसावेही लागत नाही, असा टोला संजय राऊत यांनी महायुतीमध्ये असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षला लगावला.