Vada Pav Price: सध्या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. सर्वच गोष्टीच्या किंमती वाढल्या आहेत यामुळे आता नागरिकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत असताना आता सामान्यांना आता आणखी एक फटका बसणार आहे. कारण आता वाढत्या महागाईचा फटाक आता सर्वसामान्यांचा झणझणीत वडापावाला देखील बसणार आहे. बेसन, कांदे, लसूण, तेल यांचे वाढलेले दर आणि आता पावाचे दर वाढविण्याचा निर्णय बेकरी असोसिएशनने घेतलेला असून याचा परिणाम आता वडापावाच्या दरावर देखील होणार आहे. (हेही वाचा - World Vadapav Day 2023: जागतिक वडापाव दिन, खवय्यांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव)
बेकरी असोसिएशनने पाव तयार करण्यासाठी लागणारे साहित्य महागल्याने पावांच्या लादीत आता 4 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय हा घेतला आहे. हा निर्णय आता येत्या 24 तारखेपासून लागू करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे 20 रुपयांना मिळणारी पावाची लादी आता 24 रुपयांना मिळणार असून यामुळे वडापावच्या दरात देखील 1 ते 2 रुपयांनी वाढ ही होऊ शकते.
मुंबईकरांचा आवडता वडापाव महागल्याने सर्वसामान्यांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत. कमी पैशात पोट भरण्याचा खाद्य पदार्थ म्हणून लोक वडापावकडे पाहतात. पण या वडापावच्या दरात देखील आता वाढ झाल्यामुळे सामन्यांना झटका बसणार आहे. मुंबईत साध्या गाडीवर सध्या एका वडापावची किंमत ही सध्या 15 रुपये ते 25 रुपयेच्या दरम्यान हा मिळतो. गेल्या काही वर्षापासून वडापावच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. 50 ते 100 टक्के दरम्यान ही वाढ झाली आहे.