Tunnel Collapsed News: उत्तराखंड राज्याच्या उत्तरकाशी (Uttarkashi Tunnel Accident) जिल्ह्यात रविवारी सकाळी 6 ते 7 च्या दरम्यान एक बांधकामाधीन बोगदा कोसळला. त्यामुळे जवळपास 46 कामगार बोगद्यात आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही घटना सोमवारी सकाळी ब्रह्मखाल-यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील सिल्क्यरा ते दंडलगावला जोडणाऱ्या बोगद्यात घडली. बोगद्यात अडकलेल्या कामगारांचा शोध घेतला जात असून त्यांना ऑक्सीजन पुरवण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न सुरु आहे. राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती नवारन पथक (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल, आसाम (SDRF) स्थानिक पोलिस कर्मचार्यांसह घटनास्थळी दाखल झाली आहेत. बोगद्याच्या दोन्ही बाजूंवर लक्ष केंद्रित करून बचाव कार्य सुरू आहे.
एनडीआरएफ आणि एसडीआरएफ घटनास्थळी
घटनेची माहिती मिळाल्यापासून उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी अधिकाऱ्यांशी संपर्कात आहेत. त्यांनी चिंता व्यक्त करत म्हटले आहे की, "एनडीआरएफ आणि एसडीआरएफ घटनास्थळी आहेत. आम्ही प्रत्येकाच्या सुरक्षित परतीसाठी देवाकडे प्रार्थना करतो." दरम्यान, मजूरांना वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ड्रिलिंग मशीन्स मागविण्यात आल्या आहे. ज्या डोंगर, दरीचा काही भाग कापून मजूरांर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील. प्राप्त माहितीनुसार, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना पूर्णपणे बाहेर काढण्यासाठी 2-3 दिवस लागू शकतात.
एक्स पोस्ट
#WATCH | Uttarakhand | Uttarkashi Tunnel accident: Relief and rescue work underway on war footing in Silkyara Tunnel located on Uttarkashi-Yamnotri road. NDRF and SDRF teams are present at the spot. pic.twitter.com/aETtuSKh7M
— ANI (@ANI) November 13, 2023
कामगारांना बोगद्यातून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
उत्तरकाशीचे एसपी अर्पण यदुवंशी यांनी परिस्थितीची माहिती देताना सांगितले की, बोगद्याच्या सुरुवातीच्या बिंदूपासून सुमारे 200 मीटर अंतरावर बोगदा कोसळला. कामगारांना बोगद्यातून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. शक्य त्यांना अन्न पुरवठा पाठविला जात आहे आणि कामगारांना तातडीने सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनेबाबत अधिक विचारले असता यदुवंशी यांनी जोर देत म्हटले की, बोगद्यात अडकलेल्यांना सुरक्षितपणे बाहेर काढणे याला सध्या प्राधान्य आहे. ते म्हणाले, "बोगद्याच्या बांधकामाचे काम पाहणाऱ्या एचआयडीसीएलच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बोगद्यात सुमारे 36 लोक अडकले आहेत. त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिस दल, एनडीआरएफ आणि एसडीआरएफ टीम घटनास्थळी आहेत. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आम्ही लवकरच सर्व लोकांना सुखरूप बाहेर काढू.
व्हिडिओ
#WATCH | Uttarakhand | Relief and rescue work underway on war footing in Silkyara Tunnel located on Uttarkashi-Yamnotri road. pic.twitter.com/sn9EYLiV4M
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) November 13, 2023
ढिगारा हटवण्यासाठी आणि अडकलेल्या कामगारांना सुरक्षित ठिकाणी आणण्यासाठी परिश्रमपूर्वक काम करत आहेत. या आव्हानात्मक बचाव मोहिमेचा यशस्वी परिणाम ठरवण्यासाठी येणारे दिवस महत्त्वाचे असतील, असे बचावकार्य सुरू असताना प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिकाऱ्यांनी सांगितले. देशभरात दिवाळीचा उत्सव सुरु असताना ही धक्कादायक घटना पुढे आली आहे. ज्यामुळे अवघ्या देशाचे लक्ष या घटनेकडे लागले आहे.