Used Condom in Local Train: मुंबई लोकल ट्रेनच्या सीटवर सापडला वापरलेला कंडोम; फोटो व्हायरल, चौकशीचे आदेश
Photo Credits: | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

मुंबईची लोकल ट्रेन (Mumbai Local Train) ही शहराची जीवनवाहिनी आहे. दिवसात हजारो लोक या लोकल ट्रेनने प्रवास करत असतात. या प्रवासातील अनेक चित्र-विचित्र किस्से, घटना आपण ऐकल्या असतील. आताही मुंबई लोकलबाबत अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी रात्री 9.40 वाजता अंबरनाथ स्लो लोकल ट्रेनच्या सीटवर वापरलेला कंडोम (Used Condom) सापडला आहे.

करी रोड नंतर एका प्रवाशाला हा कंडोम सीटवर दिसला होता. डोंबिवलीला पोहोचेपर्यंत तो सीटवर तसाच होता. या प्रवाशाने कंडोमचे फोटो सोशल मिडियावर शेअर केला होता.

या घटनेच्या वृत्तानंतर, मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी मुंबई आरपीएफला या प्रकरणात लक्ष घालण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबईच्या लोकल गाड्यांवर अनेकदा अस्वच्छतेमुळे टीका झाली आहे. मात्र, अशी घटना समोर येण्याची ही पहिलीच घटना असावी.

ट्रेनच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरा होता की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुंबईच्या अनेक लोकल ट्रेनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले असले तरी या घटनेबाबत कोणतेही सीसीटीव्ही फुटेज मिळालेले नाही. याबाबतचा पुढील तपास सुरु असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (हेही वाचा: Manjulika In Metro: भूलभुलैयातील मंजूलीका थेट मेट्रोत अवतरली, पॅसिंजर्सची उडाली घाबरगूंडी; Watch Video)

दरम्यान, याआधी बंगळुरू येथील एका शाळेत इयत्ता 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरांची तपासणी केली असता, त्यांच्या बॅगमध्ये कंडोम आढळला होता. त्यानंतर कर्नाटक औषध नियंत्रण विभागाने (KDCD) नुकतेच एक परिपत्रक जारी करून 18 वर्षांखालील मुलांना गर्भनिरोधक आणि कंडोमच्या विक्रीवर बंदी घातली होती. मात्र या निर्णयामुळे निर्माण झालेल्या वादानंतर हे परिपत्रक मागे घेण्यात आले.