 
                                                                 महाराष्ट्राची उप-राजधानी नागपुर (Nagpur) येथे लहान मुलांवरील अत्याचाराचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या ठिकाणी महिनाभरात तब्बल सहा मुलांसोबत कथित अनैसर्गिक लैंगिक अत्याचार (Unnatural Sex) झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, मयूर मोडक नावाचा 28 वर्षीय तरुण महाराजबाग परिसरात आंबे तोडण्याच्या बहाण्याने मुलांना निर्जनस्थळी नेत असे आणि नंतर त्यांचे लैंगिक शोषण करत असे.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मोडकवर आयपीसी कलम 377 (अनैसर्गिक लैंगिक संबंध) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या इतर तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नाईक नगर झोपडपट्टीतील ज्या मुलांचे पालक कामानिमित्त बाहेर जात असत अशा मुलांसोबत मोडक जवळीक साधायचा. त्यानंतर त्यांना आंबे तोडण्याचा बहाण्याने दूर घेऊन जाऊन लैंगिक अत्याचार करायचा. ही बाब उघडकीस आल्यापासून आरोपी मोडक फरार आहे. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. ही घटना सोमवारी उघडकीस आली जेव्हा एका 9 वर्षांच्या मुलाने आपल्या वडिलांना ही बाब कथन केला. या मुलाने इतर पीडितांची नावेही सांगितली. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. (हेही वाचा: Pune: पिंपरी-चिचवडमध्ये 12 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, 65 वर्षीय व्यक्ती अटकेत)
दरम्यान, याआधी मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात अनैसर्गिक सेक्स केल्याचे प्रकरण समोर आले होते. आरोपी मोहम्मद इर्शाद इस्लाम शेख याने एका तरुणावर तुरुंगात लैंगिक अत्याचार केला होता. या प्रकरणी एनएम जोशी मार्ग पोलिसांनी अनैसर्गिक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. यासह, बंगळूरू येथे पत्नीला अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप असलेल्या पतीविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यास कर्नाटक उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
