CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये सत्ताविभाजनावरून आलेला दुरावा कायम आहे आणि तो पुढेही कायम राहण्याची चिन्हं आहे. आज शिवसेनेचे मुख्य प्रवक्ता संजय राऊत यांनी मीडीयाशी बोलताना दिलेल्या माहितीमध्ये लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) तेलंगणा मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (Telangana CM K Chandrashekar Rao) यांची भेट घेणार असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान या भेटीसाठी मागील अनेक महिन्यांपासून काम सुरू होते. सध्या देशात बिगर भाजपा शासित राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत आम्ही एकत्र बसून एक फेडरेशन बनवणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच 2024 मधील निवडणूकांमध्ये आम्ही एकत्र लढू असे देखील संजय राऊत यांनी सुतोवाच केला आहे.

दरम्यान 2019 च्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक निकालानंतर वेगळे झालेले शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये अनेकदा खटके उडालेले पहायला मिळाले आहेत. तर शिवसेनेने भाजपाविरुद्ध कॉंग्रेस, एनसीपी सोबत हातमिळवणी केल्यानंतर त्यांच्या सत्तेला सुरूंग लावण्याचे प्लॅन्स देखील बोलून दाखवण्यात आले होते. आता गोवा विधानसभा निवडणूकीमध्येही भाजपाला चेकमेट देण्यासाठी उत्पल पर्रीकर यांच्या विरूद्ध शिवसेनेने उमेदवारी मागे घेतली आहे. हे देखील नक्की वाचा: Sanjay Raut On UP Elections: यूपी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांचे नामांकन नाकारल्याने शिवसेना नाराज, निवडणूक आयोगाकडे विचारणा करणार असल्याची संजय राऊतांची माहिती .

ANI Tweet

काही महिन्यांपूर्वी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील मुंबई मध्ये आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची भेट घेतली होती. त्यावेळी देखील भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं बोलून दाखवण्यात आली आहे.