शिवसेनेत (Shiv Sena) दसरा मेळाव्याला (Dasara Melava) विशेष महत्व आहे. अगदी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) असतांना दसरा मेळाव्यात बाळासाहेब काय बोलणार याकडे राज्यातील सर्व जनतेचं लक्ष लागलेलं असायचं. बाळासाहेबांनंतर पुत्र उध्दव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) या मेळाव्याची परंपरा कायम ठेवली. बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेना प्रमुख म्हणून उध्दव ठाकरे या मेळाव्यातून भाषण करु लागले. गेले दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभुमिवर हा मेळावा होवू शकला नाही म्हणून यावर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा अगदी दणक्यात पार पडणार अशी समज होती पण या वर्षी दसऱ्याला शिवसेनेचं चित्र काही वेगळचं आहे. यावर्षी दसरा मेळाव्यावरुन उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटात चुरस निर्माण झाली आहे. शिवसेना कुणाची हा सत्तासंघर्ष सुरु असताना आता दसरा मेळावा कुणाचा सा प्रश्न निर्माण झाला आहे.
दसरा मेळाव्याला परवानगी मिळवण्यासाठी शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेला (BMC) परवानगीसाठी अर्ज केलेला आहे. पण अद्याप शिवसेनेला कोणतीही परवानगी देण्यात आली नसल्याची माहिती मिळत आहे. शिवसेना (Shiv Sena) नेमकी कोणाची? हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) प्रलंबित आहे. शिंदे गटाकडून वारंवार शिवसेना पक्ष, पक्षाचं चिन्ह यांवर दावा केला जात आहे. अशातच आता शिंदे गटाकडून शिवसेनेचा दसरा मेळावाही हायजॅक होणार का? या चर्चेना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. (हे ही वाचा:- Shiv Sena and Sambhaji Brigade Alliance: शिवसेना आणि संभाजी ब्रेगेड यांच्यात युती, राज्यात नवं राजकीय समीकरण)
तरी जर उध्दव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) गटा ऐवजी जर शिंदे गटाकडून दसरा मेळावा घेण्यात आला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) दसरा मेळाव्याचं (Dasara Melava) भाषण देणार का अशी उत्सुकता राज्यातील जनतेला आहे. किंवा जोडीने सगळ्या कार्यक्रमांना उपस्थिती लावणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Cm Devendra Fadnavis) शिवसेनेच्या दसरा मेळव्यात एकाच व्यासपीठावर दिसतील या चर्चांना देखील उधाण आलं आहे.