शिवसेना (Shiv Sena) आणि संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) एकत्रित येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड आगामी सर्व निवडणूका (Election) यूतीत लढवणार असल्याची यावेळी माहिती देण्यात आली. संबंधीत माहिती शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संभाजी ब्रिगेडचे (Sambhaji Brigade) अध्यक्ष मनोज आखरे (Manoj Aakhare) यांनी संयुक्त पत्रकार परिषद (Press Conference) घेत दिली आहे. तरी राज्याचे राजकारण (Maharashtra Politics) आता एका नव्या वळणावर येवून ठेपले आहे. काही दिवसांपूर्वीच उध्दव ठाकरे बंधू राज ठाकरेंना (Raj Thackeray) टाळी देतील का अशा चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु होत्या पण त्यासंबंधीत राज ठाकरेंकडून कुठलाही इशारा देण्यात आला नाही किंवा उध्व ठाकरेंकडूनही पाऊल उचलण्यात आलेलं नाही.
शिवसेनासह (Shiv Sena) संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) राज्याच्या राजकारणात हे एक नवीन समीकरण पुढे येत आहे. पत्रकार परिषदेदरम्यान उध्दव ठाकरे म्हणालेत या एकीनं शिवप्रेमी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला मानणारी मंडळी आनंदी होईल. संविधान (Indian Constitution) टिकवण्यासाठी ही युती झाली आहे. मला आपण एकत्र आल्याचा आनंद आहे. आपली भूमिका रोखठोक आहे. ती आपल्याला पटली म्हणून आपण एकत्र आलो आहोत, अशी प्रतिक्रीया उध्दव ठाकरे यांनी दिली आहे. (हे ही वाचा:- Maratha Reservation: मराठा आरक्षण घेऊन निवडसूचीत असलेल्या 1 हजार 64 उमेदवारांना तत्काळ नियुक्ती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा)
शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र आल्याचा मला आनंद आहे. आपली भूमिका रोखठोक आहे. ती आपल्याला पटली म्हणून आपण एकत्र आलो आहोत !
— Uddhav Thackeray (@uddhavthackeray) August 26, 2022
शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांची पत्रकार परिषद - LIVE https://t.co/fGpSNwYtyW
— ShivSena - शिवसेना (@ShivSena) August 26, 2022
तर लवकरच शिवसेना (Shiv Sena) आणि संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) कडून महामेळावा घेणार असल्याची घोषणा संभाजी ब्रिगेडचे मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे (Gangadhar Banbare) यांनी केली आहे.छोटे पक्ष संपवण्याचं कारस्थान सध्या सुरु आहे. लोकशाही (Democracy) सध्या धोक्यात आली आहे. छोटे पक्ष, संघटना आणि विचारधारा अस्तित्वात ठेवायची असेल तर एकत्र येणं गरजेचं आहे, त्यामुळं आम्ही एकत्र आलो आहोत, असं मत बनबरे यांनी मांडली आहे.