मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्यासह इतर अन्य मागण्यांच्या संदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे काल विशेष बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) आणि मंत्रिमंडळातील इतर महत्वाचे मंत्री उपस्थित होते. दरम्यान मराठा आरक्षणासंबंधी मोठे निर्णय घेण्यात आले. 25 विविध विभागातील पदांसाठी 2014 पासून 9 सप्टेंबर 2020 पूर्वी परीक्षा (Exam) देऊन उत्तीर्ण मराठा समाजातील पात्र उमेदवारांना अधिसंख्य पदे निर्माण करून सरकारी नोकरीत (Government Job) समाविष्ट करून घेण्याची घोषणा शिंदे फडणवीस सरकारकडून (Shinde Fadnavis Government) करण्यात आली आहे. समाजातील तरुणांना अधिसंख्य पदे निर्माण करून शासकीय सेवेत समाविष्ट करून घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
मराठा आरक्षण निवडसूचीतील 1 हजार 64 उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली आहे . या नियुक्त्या करण्याबाबतचा अध्यादेश तातडीने काढण्यात येईल तसेच या उमेदवारांना तातडीने नियुक्त करण्यात येईल असं शिंदे फडणवीस सरकारकडून सांगण्यात आलं आहे. तसेच उर्वरित 702 उमेदवारांना नियुक्ती (Posting) देण्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी (Collector) तसेच विभागांमार्फत विशेष मोहीमही राबविण्यात येईल असे स्पष्ट केले आहे. (हे ही वाचा:- Anand Dighe Memorial Day: स्वर्गीय आनंद दिघे यांच्या स्मृतीदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अभिवादन)
यासमयी मराठा आरक्षण निवडसूचीतील १ हजार ६४ उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. या नियुक्त्या करण्याबाबतचा अध्यादेश तातडीने काढण्यात येईल तसेच या उमेदवारांना तातडीने नियुक्त करण्यात येईल pic.twitter.com/ynfUAu13BV
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 25, 2022
पद नियुक्ती सोबतच मराठा तरुणांना कौशल्य विकास करणारी सारथी संस्था व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला सक्षम करण्यात येईल तसेच सारथी संस्थेत नवनवीन कोर्सेस (New Courses) सुरू करण्यासाठी नवीन पदे भरणे (Recruitment), त्यासाठी लागणारे इतर मनुष्यबळ वाढवण्यासाठी वाढीव निधी देण्याचे आश्वासन देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून (CM Eknath Shinde) देण्यात आले आहे.