शिवसेना आज सत्ता स्थापन करणार की नाही हा निकाल काहीच वेळात कळणार आहे. कारण आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे राजभवनाच्या दिशेने निघाले आहेत.
टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याचे ठरवले असले तरी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी मात्र त्यांनी नकार दिला आहे. तसेच दोन्ही पक्षांनी उद्धव ठाकरे यांचा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी सुचवला आहे.
त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री (New Chief Minister of Maharashtra) बनणार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शिवसेनेने आधी त्यांचा मित्रपक्ष असलेल्या भाजपकडे मुख्यमंत्री पदाची मागणी केली होती. परंतु भाजपने ही मागणी न ऐकल्याने शिवसेनेने त्यांना सत्तास्थापनेत साथ दिली नाही. त्यामुळे भाजपने राज्यपालांसमोर सत्ता स्थापनेसाठी असामर्थ्य दर्शवले.
आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे राजभवनाच्या दिशेने; शिवसेना करणार सत्तास्थापनेचा दावा?
राज्यपालांनी मग शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी एक दिवसाचा कालावधी दिला होतं. आणि हा कालावधी आता काहीच वेळात संपणार असून शिवसेना त्यांचा निकाल काय जाहीर करते याकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे.