आज सकाळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (BS Koshyari) यांना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आल्यानंतर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra CM Uddhav Thackeray) देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आले आहे. कमलनाथ यांनी काही वेळापूर्वीच त्याची माहिती दिली आहे. राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्वभमीवर काँग्रेस पक्षानं महाराष्ट्रासाठी निरीक्षक म्हणून ज्येष्ठ नेते कमलनाथ यांची नियुक्ती केली. कॉंग्रेस सोबतच्या बैठकीनंतर ते ठाकरेंची भेट घेणार होते पण त्यांनी ही भेट टाळण्याचं कारण मुख्यमंत्री कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विधानसभा बरसखास्तीचा विचार नसल्याचं सांगितलं आहे. दरम्यान आजच्या महाराष्ट्र कॅबिनेटची बैठक होणार आहे ही बैठक व्हर्च्युअल होणार असल्याचं कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं आहे. त्यावेळी त्यांनी देखील मुख्यमंत्री कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं म्हटलं आहे. हे देखील नक्की वाचा: Maharashtra Governor BS Koshyari Tests COVID Positive: भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण; Sir H. N. Reliance Foundation Hospital मध्ये दाखल .
मागील अडीज वर्ष कोरोनाला हुलकावणी देण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करत होते, काळजी घेत होते मात्र मागील काही दिवस राज्यसभा, विधानपरिषद निवडणूक आणि नंतर पक्षात झालेली बंडाळी यामुळे त्यांच्या गाठीभेटी वाढल्या आणि या दरम्यान त्यांना संंसर्ग झाला असावा असा अंदाज आहे. दरम्यान सध्या राज्यात राजकीय अस्थिरता असताना महत्त्वाच्या व्यक्तींना कोरोनाची लागण होणं हा 'पॉलिटिकल कोरोना' आहे का? अशी चर्चा देखील माध्यमांमध्ये रंगत आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार उद्धव ठाकरेंची क्विक अॅन्टिजन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे त्यानंतर आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह आल्याने त्यांच्या कोविड बद्दल संभ्रम आहे.
#WATCH | Mumbai: "Maharashtra CM Uddhav Thackeray has tested positive for #COVID19," says Congress Observer for the state, Kamal Nath. pic.twitter.com/wl22yJkXXt
— ANI (@ANI) June 22, 2022
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी गिरगावच्या रिलायंस हॉस्पिटल मध्ये दाखल आहेत. तर उद्धव ठाकरे सध्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानीच असल्याची माहिती आहे. अद्याप उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीबद्दल कोणतीही अधिकृत माहिती शिवसेनेकडून, सीएमओ कार्यालयाकडून देण्यात आलेली नाही.