उद्धव ठाकरे आणि अमित शहा (Photo Credits: IANS)

महाराष्ट्र राज्यात सत्ता स्थापनेचा संघर्ष अगदी शेवटच्या क्षणापर्यंत थांबलेला नाही. देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत अडीच वर्षाचा कोणताही फॉर्म्युला शिवसेना आणि भाजप पक्षात ठरलेला नव्हता. याला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनीसुद्धा आज पत्रकार परिषद बोलावली.

पत्रकारणशी संवाद साधताना, उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेनेमध्ये नक्की काय बोलणं झालं होतं याचा खुलासा केला. दोन्ही पक्षांतील बोलणं हे मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीमध्ये हे बोलणं झालं होतं असंही ते म्हणाले.

“युतीच्या कोणत्याही चर्चेसाठी मी दिल्लीला गेलो नव्हतो तर अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस हे स्वतः मातोश्रीवर मला भेटायला आले होते. त्यावेळी ते म्हणाले आता मला शिवसेनेसोबतचे संबंध सुधारायचे आहे.आम्ही मुख्यमंत्रीपदाचं समसमान वाटप झालं हे ठरलं होतं," याचा त्यांनी खुलासा केला.

मुख्यमंत्र्यांची त्यावेळेची भूमिका स्पष्ट करत ते म्हणाले, "त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले होते की हे जर आता जाहीर झालं तर मला पक्षाअंतर्गत प्रॉ़ब्लेम होईल."

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस असे नवे सत्ता समिकरण महाराष्ट्रात अस्तित्वात येण्याची चिन्हे, हे चेहरे मंत्रिमंडळात झळकण्याची शक्यता

तसेच, "शब्दाचे खेळ कसे करतात, शब्द कसे फिरवतात हे आज मला कळलं !"असे म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला.