शिवसेना-भाजप (Shiv Sena-BJP)यांच्यातील सत्तासंघर्षातून प्रचंड मोठी दरी निर्माण झाली आहे. याची प्रचिती भाजप (BJP) आणि शिवसेना (Shiv Sena) नेतृत्वाने घेतलेल्या पत्रकार परिषदांमधून आली. त्यानंतर अल्पावधीतच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे प्रमुख नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचे निवासस्थान 'सिल्वर ओक' येथे दाखल झाले आहेत. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) हे देखील या ठिकाणी पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे नवे सत्तासमीकरण अस्तित्वात येण्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे. ही शक्यता प्रत्यक्षात आली तर सत्तेवर येणाऱ्य मंत्रीमंडळात काही प्रमुख चेहरे दिसण्याची शक्यता आहे.
राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, शिवसेनच्या वतीने आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, जयंत शिरसाट, सुनिल प्रभू , सदा सरवणकर आदी चेहरे शिवसेनेच्या वतीने मंत्रिमंडळात झळकण्याची शक्यता आहे.
दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजित पवार, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, नवाब मलिक, दिलीप वळसे पाटील, दत्ता भरणे आदी मंडळींना संधी मिळू शकते. (हेही वाचा, भाजपच्या मनात सत्तेची लालसा, गंगा साफ करता करता त्यांची मनंही कलुषित झाली: उद्धव ठाकरे)
अर्थात वरील नावांची केवळ शक्यता आहे. अद्याप शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस हे नवे समिकरण अस्तित्वात आले नाही. दरम्यान, शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात काँग्रेस बाहेरुन पाठिंबा देण्याची शक्यता आहे. राजकारणात काहीही घडू शकते. त्यामुळे नवे सत्तासमिकरण कसे उदयास येते याबाबत उत्सुकता आहे.