महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) सोहळ्यात घडलेल्या दुर्घटनेप्रकरणी (Uddhav Thackeray On Sunstroke Deaths) आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि घटनेची नैतीक जबाबदारी स्वीकारुन राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे आयोजन पहिल्यांदाच केले गेले नाही. या आधीही अनेक वेळा अशा कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे. परंतू, या वेळी जितक्या मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आले तितक्याच मोठ्या प्रमाणावर नियोजनही करणे आवश्यक होते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
भारतीय जनता पक्षाचा अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यापेक्षा त्यांच्या अनुयायांवर डोळा आहे. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे लोक आहेत. या लोकांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे या मोठ्या समूहाला आपले अनुयायी बनविण्यासाठी भाजपचा आटापीटा सुरु असल्याची घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. (हेही वाचा, खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील दुर्घटनेची एक सदस्यीय समितीमार्फत चौकशी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)
दरम्यान, शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी गुरुवारी दावा केला की 'महाराष्ट्र भूषण कार्यक्रम एक शोकांतिका' ठरली. या कार्यक्रमामध्ये सुमारे 50 ते 75 लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, महाराष्ट्र सरकार वास्तविक मृतांची संख्या लपवत आहे. राऊत पुढे म्हणाले, सर्व गावांची (रायगड तालुक्यांतील) एकूण आकडेवारी पाहिली तर किमान 50 आणि जास्तीत जास्त 75 लोकांचा मृत्यू झाला आहे. 'खोके सरकार' त्यांच्या घरी पोहोचले आणि कुटुंबातील इतर सदस्यांचा आवाज दाबला.
ट्विट
जिन्होंने यह आयोजन किया उनके ऊपर गुनाह दाखिल होना चाहिए। महाराष्ट्र के मुख्यमंत्री और उपमुख्यमंत्री को खुद ज़िम्मेदारी लेकर अपने पद से इस्तीफा देना चाहिए। ऐसा नहीं कि महाराष्ट्र भूषण समारोह पहली बार हुआ, इससे पहले भी कई बार हुआ है। अगर उनको इतने बड़े स्तर का आयोजन करना था तो… pic.twitter.com/y3vaWIpYna
— ANI_HindiNews (@AHindinews) April 20, 2023
सामाजिक कार्यकर्ते अप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यासाठी नवी मुंबईतील खारघर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्या आले होते. कडाक्याच्या उन्हात झालेल्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. मात्र, तीव्र उष्मा आणि तळपते उन यामुळे 14 जणांचा मृत्यू झाला. अनेकांना रुग्णालयात दाखल करावे लागले, अशी माहिती सरकारी आकडेवारीतून पुढे आली आहे.