Eknath Shinde

नवी मुंबई (Navi Mumbai) येथील खारघर (Kharghar) परिसरात 16 एप्रिल रोजी झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) सोहळ्यातील दुर्घटनेच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी एक सदस्यीय समिती नेमली. निरुपनकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात 14 जणांचा उष्माघाताने (Sunstroke Deaths) मृत्यू झाला. त्यामुळे राज्य सरकारवर टीकेची झोड उठली होती.

सामाजिक कार्यकर्ते आणि निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार दिला जात असल्याचे पाहण्यासाठी विस्तीर्ण आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्कमध्ये लाखो लोकांची गर्दी झाली होती. उन्हाळ्याच्या दिवसात भर दुपारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे उपस्थितांना उन्हाचा तडाका सहन न झाल्याने 14 जणांचे प्राण उष्माघातामुळे हानाक गेले.

मुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) नितीन कीर यांच्या अध्यक्षतेखाली या घटनेची चौकशी होईल. नितीन कीर हे या हे समितीचे एकमेव सदस्य असतील. ही समीती घटनेची वस्तुस्थिती तपासेल आणि अशा कार्यांचे आयोजन करताना काय पावले उचलायला हवी याबाबत शिफारस करतील. (हेही वाचा, निपचीत पडलेली महिला आणि प्रचंड चेंगराचेंगरी; जितेंद्र आव्हाड यांनी शेअर भीषण व्हिडिओ)

मुख्यमंत्री कार्यालयाने याच निवेदनात पुढे म्हले आहे की, ही समिती महिनाभरात आपला अहवाल राज्य सरकारला सादर करेल. कडक उन्हाळ्यात आणि पुरेशा व्यवस्थेशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल राज्य सरकारवर तीव्र टीका होत असताना समितीची स्थापना करण्यात आली आहे. शिवसेना (उबाठा) काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह काही विरोधी पक्षांनी या मृत्यूसाठी राज्य सरकारविरुद्ध दोषी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.