Crowd Stampede Video | (Image Credit - ANI Twitter)

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. आव्हाड यांनी शेअर केलेला व्हिडिओ (Jitendra Awhad Shared Crowd Stampede Video) गर्दीत झालेल्या चेंगराचेंगरीचा आहे. व्हिडिओत पाहायला मिळते की, प्रचंड गर्दीमध्ये एक महिला निपचीत पडली आहे. आजूबाजूलाही काही लोक पडले आहेत. गर्दीचा रेटा मात्र थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. व्हिडिओत प्रशासनाचे एक वाहनही सायरन वाजवत उभे असल्याचे दिसते आहे. हा भीषण व्हिडिओ पाहून ट्विटर वापरकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, हा व्हिडिओ मात्र नेमका कुठला आहे याची पुष्टी होऊ शकली नाही. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत सरकारला सवाल केला आहे. आव्हाड यांनी म्हटले आहे की, ''समाज माध्यमांमधून हा व्हिडिओ आला आहे. हा व्हिडिओ मॉर्फ नाही कारण, महाराष्ट्र शासनाची गाडी दिसते हा चेंगराचेंगरीचा प्रकार कुठे घडला असावा?'' व्हिडिओमध्ये गर्दी इतकी प्रचंड दिसत आहे की, मुंगी शिरायलाही वाव नाही. ही गर्दी नेमकी का जमली आहे. त्याचे आयोजक कोण, प्रशासनाची गाडी तिथे मदत पोहोचविण्यासाठी आली आहे की, परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी? या प्रश्नांची कोणतीच उत्तरे अद्याप पुढे आली नाहीत. मुळात हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, याबाब स्थळ, काळ आणि वेळ यांबाबत कोणतीच माहिती अद्यापपर्यंत तरी पुढे आली नाही. (हेही वाचा, Maharashtra Bhushan Award: महाराष्ट्र भूषण सोहळा, Heat Stroke पीडितांची उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्याकडून रुग्णालयात भेट; मृतांच आकडा 11 वर पोहोचला)

व्हिडिओ

जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर समाजमाध्यमांमध्ये शेअर केला जात आहे. व्हिडिओला लाईक, रिट्विट आणि कोटसह रिट्विटही मोठ्या प्रमाणावर होत आहे. हे वृत्त लिहीपर्यंत हा व्हिडिओ 696 वापरकर्त्यांनी रिट्विट केला आहे. तर 141 वापरकर्त्यांनी स्वतंत्र कोट करत रिट्विट केला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 1,770 लाईक मिळाल्या आहेत. ही संख्याही प्रचंड वाढत आहे.

ट्विट

ट्विट

दरम्यान, व्हिडिओ पाहून अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये अनेक मान्यवर नेते, कार्यकर्ते, पत्रकार आणि सर्वसामान्य वापरकर्त्यांचाही समावेश आहे. विरेंद्र नावाच्या एका वापरकर्त्याने म्हटले आहे की, 'एकनाथ शिंदे यांच्याकडे नैतिकता उरली असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा कारण ते सरकार चालवण्यास सक्षम नाहीत.' संकल्प श्रीवास्तव यांनी व्हिडिओ रिट्विट करत म्हटले आहे की, 'सत्कार केला, पुरस्कार ही दिला पण असा जर घडत असेल तर हे सरकार स्वतःच्या राजकारणा पोटी लोकांचे आयुष्य वेठीस धरत आहे. निर्लज्जपणाचा कळस आहे हा...' सूंदर स्पीक नावाच्या ट्विटर हँडलने 'हत्याकांडाचा व्हिडीओ बाहेर आला' असे म्हणत हा व्हिडिओ रिट्विट केला आहे. दीपाली प्रभू नामक वापरकर्त्याने 'हे फार भयंकर आहे... Extremely disturbing visuals. ही घटना कुठली आहे ते कळत नाही आहे... मीडिया सांगू शकेल का? ह्या लोकांना वेळेत वैद्यकीय मदत मिळाली असेल का? ' असे म्हणत हा व्हिडिओ मराठी प्रसारमाध्यमांच्या ट्विटर हँडलना टॅग केला आहे.

ट्विट

ट्विट

दरम्यान, व्हिडिओ पाहून महाराष्ट्र पालीस आणि राज्य सरकार दखल घेणार का? हा व्हिडिओ नेमका कुठला आहे. ही गर्दी कोणत्या कारणासाठी जमली आहे. त्याचे आयोजक कोण होते. या घटनेला जबाबदार असणाऱ्यांंवर कारवाई करणार का? असे एक ना अनेक प्रश्न या व्हिडिओनंतर निर्माण झाले आहेत.