Uddhav Thackeray On Maratha Reservation: मराठा आरक्षणात सरकार लढतयं, रस्त्यावर मोर्चे, आंदोलन काढुन संकट वाढवु नका- उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook Video)

मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांंनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला होता यावेळी कोरोना परिस्थिती, माझे कुटुंंब - माझी जबाबदारी मोहिम, पुर्व विदर्भातील पुरग्रस्तांंना मदत, शेतकर्‍यांंची कर्जमाफी या मुद्द्यांंवर ठाकरे यांंनी भाष्य केले. याशिवाय मराठा आरक्षणावर सुद्धा उद्धव ठाकरे यांंनी आपले मत व्यक्त केले आहे. मराठा आरक्षणाच्या (Maratha Resrvation) अमंलबजावणीला सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) स्थगिती दिली आहे. वास्त्विक मराठा आरक्षण खटला हा मोठ्या खंडपीठाकडे जावा अशी मागणी होती त्यास परवानगी मिळाली मात्र त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने अंमलबजावणी साठी अंतरिम स्थगिती लागु केली ज्याची गरज नव्हती मात्र आता या खटल्यात महाराष्ट्र सरकार लढत आहे आणि पुढेही लढणार आहे त्यामुळे मधल्या वेळेत मराठा समाजातील बांंधवांंनी रस्त्यावर मोर्चे, आंदोलन काढुन संकट वाढवु नये असे आवाहन वजा विनंंती सुद्धा ठाकरे यांंनी केली आहे.

CM Uddhav Thackeray Live: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधला जनतेशी संवाद; पहा कोविड-19, मराठा आरक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न याबद्दल मुख्यमंत्री काय म्हणाले

मराठा आरक्षणाला विधानसभेत सर्व पक्षांंनी पाठिंबा दर्शवला होता, एकमताने हा ठराव मंंजुर झाला होता, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांंच्यासहित महाविकासआघाडी चे नेते सुद्धा या ठरावाच्या बाजुने आहेत, जेव्हा या आरक्षणाला आव्हान केले गेले त्यातही सरकारला यश आले. आता सुप्रीम कोर्टात सुद्धा राज्य सरकार पूर्ण ताकदीने बाजू मांडत आहे. मराठा समाजाच्या सर्व सुचनांचा विचार करून रोडमॅप आखला जात आहे. कायदेतज्ञांंशी चर्चा केली जात आहे. मोठमोठ्या वकीलांंना नेमले जात आहे. राज्य सरकार यश मिळेपर्यंत सरकार चिकाटीने लढत आहे असेही ठाकरे यांंनी म्हंंटले आहे.

उद्धव ठाकरे Live

दरम्यान, मराठा समाज आंदोलन करत असताना आम्ही त्यांंच्या भावना समजु शकतो मात्र हे आंदोलन कोणाच्या विरुद्ध करत आहात? कारण सरकार तर तुमच्याच बाजुने आहे, आपण सगळेच या खटल्यासाठी लढत आहोत अशा वेळी गर्दी, आंदोलने करुन कोरोनाच्या संकटात भर पाडु नका अशी विनंती उद्धव ठाकरे यांंनी केली आहे.