Kalyan Railway Station (Photo Credit: ANI)

धावत्या रेल्वेतून चढू अथवा उतरू नका, असे प्रशासनाकडून वारंवार सांगितले जाते. परंतु. गडबडीत असल्याने अनेक प्रवासी आपला जीव धोक्यात घालून रेल्वेत चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करतात. हे प्रयत्न अनेक प्रवाशांच्या जीवावर बेतल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. दरम्यान, कल्याण स्थानकावरील (Kalyan Railway Station) अशीच एक घटना समोर आली आहे. कल्याण रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वेतून एका एका प्रवाशाने प्रयत्न केला. त्यावेळी या प्रवाशाचा तोल गेल्याने तो खाली कोसळला. सुदैवाने, त्याठिकाणी उपस्थितीत असलेल्या दोन रेल्वे पोलिसांनी त्या व्यक्तीचा जीव वाचवला आहे. यासंदर्भात एएनआय वृत्त संस्थेने माहिती दिली आहे.

एएनआय वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रेल्वेतून खाली उतरताना दिसत आहे. मात्र, त्याचवेळी त्या व्यक्तीचा तोल गेल्याने तो गाडीतून खाली कोसळला. सुदैवाने, त्याठिकाणी उपस्थित असलेल्या दोन रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्या व्यक्तीचा जीव वाचला आहे. हे देखील वाचा- Coronavirus: दिलासादायक बातमी; लवकरच महाराष्ट्रातील 'हे' दोन शहरं कोरोनामुक्त होणार

एएनआयचे ट्विट-

रेल्वेतून प्रवास करताना प्रवाशांच्या हलगर्जीपणामुळे त्यांनी स्वत:चा जीव गमवला आहे. यात पुरुष, महिला यांच्यासह तरूणांचाही समावेश आहे. यातील काही तरूणांचा स्टंटबाजी करण्याचा नादात मृत्यू झाला आहे. यासंदर्भात रेल्वे प्रशासनाकडून वारंवार जनजागृती केली जाते. मात्र, तरीही अशाप्रकारच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत.