महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नव्या अडचणीत सापडले आहे. फडणवीस यांनी 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान आपल्या प्रतिज्ञापत्रात महत्त्वाची माहिती न लिहिल्यामुळे त्यांच्यासाठी आता ही नवी अडचण निर्माण झाली आहे. निवडणूक अर्ज दाखल करताना, फडणवीस यांनी त्यांच्यावर असलेल्या दोन फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवली असल्याने त्यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला होता. या खटल्यावर आज नागपूरच्या सत्र न्यायालयात सुनावणी होती. मात्र सुनावणीसाठी फडणवीस यांना आज कोर्टात हजर राहता येणार नाही असं त्यांनी आपल्या वकिलांमार्फत कोर्टाला सांगितले.
आता या खटल्याची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून येत्या 4 जानेवारी रोजी यावर सुनावणी होणार आहे. मात्र फडणवीसांना 4 तारखेला कोर्टात हजर राहणं अनिवार्य आहे.
फडणवीस यांनी प्रतिज्ञापत्रात लपवलेल्या माहितीसाठी त्यांना पाच दिवसांपूर्वी स्थानिक न्यायलयाकडून समन्स बजावले होते. हे समन्स फडणवीस यांच्या नागपूर येथील निवासस्थानी पाठवण्यात आले होते. आणि 1 नोव्हेंबर रोजी दंडाधिकारी न्यायालयाकडे देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचा अर्ज दाखल झाला करण्यात आला होता. या अर्जानुसार, नागपूर मधील वकील सतीश उके यांनी फडणवीस यांच्याविरूद्ध फौजदारी कारवाई सुरू करावी अशी मागणी त्यात करण्यात आली होती.
एकनाथ खडसे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल; अपयशाची जबाबदारी घ्यावी, अशा शब्दात दिला इशारा
महत्त्वाचे म्हणजे वकील उके यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातील बदनामी आणि फसवणूक असे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.