Ghatkopar Hoarding Collapse: घाटकोपर येथील दुर्घटनेत आणखी दोन मृतदेह आढळले, अद्याप बाहेर काढणे बाकी
Photo Credit - X

Ghatkopar Hoarding Collapsed: मुंबईतील घाटकोपर येथील दुर्घटनेत होर्डिंग कोसळले (Hoarding Collapse)ल्या ठिकाणी आणखी दोन मृतदेह सापडल्याची(Two Bodies Found) माहिती मिळत आहे. मात्र, अद्याप ते बाहेर काढण्यात आलेले नाहीत. काल मंगळवारी रात्री हे मृतदेह रेस्क्यू टीमला आढळून आले. मात्र अद्याप ते बाहेर काढणे बाकी आहे. (हेही वाचा:Ghatkopar Hoarding Collapse Incident: घाटकोपर मध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे फरार)

मुंबईत सोमवारी वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस बरसला. यात अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्या. त्यात घोटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर मोठे होर्डिंग कोसळले.बुधवारी बचाव कार्य सुरू असताना ढिगाऱ्याखाली दोन मृतदेह सापडले आहेत, अशी माहिती एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी दिली.बचाव पथकांनी यापूर्वी 14 मृतदेह बाहेर काढले होते, तर या घटनेत 75 जण जखमी झाले होते.

बुधवारी सकाळी बचाव कार्य दुर्घटनास्थळी एक छोटी आग लागल्याची घटना घडली होती. परंतु तेथे तैनात असलेल्या अग्निशमन दलाने ती तात्काळ आटोक्यात आणली, असे एनडीआरएफच्या अधिकाऱ्याने सांगितले. पीटीआयला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते. घाटकोपर दुर्घटनेला ४० तास उलटून गेले आहेत. बचाव कार्य अजूनही सुरू आहे.