Ghatkopar Hoarding Collapse Incident: घाटकोपर मध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे फरार
Mumbai Police | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

मुंबई मध्ये काल झालेल्या वादळी पाऊस आणि वार्‍यामुळे पंतनगर भागातील बीपीसीएल च्या पेट्रोप पंपावरील होर्डिंग कोसळून 14 जणांचा जीव गेला आहे. आता या दुर्दैवी घटनेला जबाबदार आरोपी भावेश भिंडे (Bhavesh Bhinde) विरूद्ध FIR दाखल करण्यात आला आहे. मात्र हा भावेश भिंडे फरार असून त्याचा मोबाईल फोन देखील बंद आहे. सध्या पोलिस भावेश भिंडेच्या मागावर आहेत. मुलुंड मधील त्याच्या घराची पोलिसांनी झाडाझडती घेतली आहे.

इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड' जाहिरात एजन्सी आणि होर्डिंग कंपनीचा मालक भावेश भिंडे घाटकोपरच्या दुर्घटनेला जबाबदार आहे. या प्रकरणी बोलताना भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी , “या दुर्घटनेला जबाबदार असलेला भावेश भिंडे आपल्या कुटुंबासह फरार झाला आहे, मी पोलिसांना रेड कॉर्नर नोटीस जारी करून फरार घोषित करण्याची विनंती केली आहे. भावेश भिंडे यांच्या इगो मीडियाने ठिकठिकाणी 24 हून अधिक बेकायदेशीर होर्डिंग्ज लावले आहेत." अशी प्रतिक्रिया दिली आहे.

भावेश भिंडे हा एक सर्वसामान्य घरातील मुलगा होता. त्याचे वडील रिक्षा चालक होते. अॅड एजन्सीमध्ये ऑफिस बॉयचं काम केलेल्या भावेश भिंडेने 1993 मध्ये त्याने स्वत:चा होर्डिंगचा व्यवसाय सुरू केला. भावेशने येथूनच आपल्या व्यवसायाची सुरुवात केली. ठाणे, मुलुंड, भांडूप, कुर्ला, कांजूरमार्ग, घाटकोपर, विद्याविहार, कुर्ला, माटूंगा, परेल या भागात तो जाहिराती लावत होता.  Hoarding Falls On BPCL Petrol Pump In Ghatkopar: घाटकोपर मधील पेट्रोल पंप वर होर्डिंग कोसळल्याच्या घटनेत चौघांचा मृत्यू; CM Eknath Shinde यांनी दिले दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश .

आता भावेश भिंडे वर घाटकोपरच्या दुर्घटना प्रकरणामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल मुख्यमंत्री, उप्मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं म्हटलं आहे.