Ayodhya Verdict: धुळे जिल्ह्यात शांतता भंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
Representational Image (Photo Credits: File Photo)

रामजन्मभूमी (Ram Mandir) आणि बाबरी मशीद (Babri Masjid) वादावरील सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आज एतिहासीक निर्णय दिला आहे. यातच धुळे जिल्ह्यात शांतता भंग केल्याप्रकरणी दोघांवर धुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून आयोध्या प्रकरणाचा निकाल येण्यापूर्वीच संबधित आरोपींनी भडकाऊ कृत्य करुन दोन समुदयात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. महत्वाचे म्हणजे, या निर्णयानंतर राज्यात कोणताही वाद निर्माण होऊ नये, यासाठी राज्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र पोलिसांकडूनही नागरिकांना शांततेच अवाहन करण्यात आले आहे.

रामजन्मभूमी- बाबरी मशीद प्रकरणात सर्वोच्च कोणाच्या बाजूने निकाल देणार? असा प्रश्न अनेकांच्या मनात फिरत होते. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर देशात मोठा वाद निर्माण होईल, अशी शक्यता केली जात होती. यामुळे देशभरात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैन्यात करण्यात आले होते. दरम्यान, धुळे शहरात शांतता भंग केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. एकीकडे धुळे येथील जुन्या आग्रा रोड परिसरातील काही दुकानांच्या भिंतीवर राजेंद्र मराठे याने ऑइल पेंटने जय श्रीराम असे लिहित शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे धुळ्यातीलच गोरक्षक संजय शर्मा याने स्वतःच्या फेसबुक अकाऊंटवरून वादग्रस्त पोस्ट केल्यामुळे त्याच्याविरोधात आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. यामुळे धुळे पोलिसांना ताब्यात घेतले असून दोघांची चौकशी केली जात आहे, अशी माहिती एबीपी माझाने दिली आहे. हे देखील वाचा- Ayodhya Judgment: अयोध्या निकाल पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कलम 144 लागू; पोलिसांकडून नागरिकांना शांततेचे आवाहन

दरम्यान, नागरिकांनी कोणतेही वादग्रस्त विधान करु नये, माध्यमातून कुठल्याही जाती, धर्माविषयी आक्षेपार्ह टिपण्णी, व्हिडीओ, संदेश पोस्ट करू नये असे आवाहन महाराष्ट्र पोलिसांनी केले आहे.