(Photo Credits: Facebook)

रामजन्मभूमी (Ram Mandir) आणि बाबरी मशीद (Babri Masjid) वादावरील सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आज एतिहासीक निर्णय दिला आहे. महत्वाचे म्हणजे, या निर्णयानंतर राज्यात कोणताही वाद निर्माण होऊ नये, यासाठी राज्यात जमावबंदी कायदा लागू करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र पोलिसांकडूनही नागरिकांना शांततेच अवाहन करण्यात आले आहे. निकालापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनीही न्यायालयाच्या निकालाचा सन्मान सर्वांनी सन्मान करावा, त्याचबरोबर शांतता राखावी असे जनतेला आवाहन केले होते. सध्या देशभरातून न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. तरीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणीही वादग्रस्त आणि भडकाऊ टीका टिपण्णी टाळावे, असे आवाहन महाराष्ट्र पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आले आहे.

महाराष्ट्र पोलिसांचे अधिकृत ट्वीट-