Maharashtra Crime News: कल्याण (Kalyan) येथून शुक्रवारी अपहरण (Kidnapping) झालेल्या पाच आणि आठ वर्षांच्या दोन तरुण भावांची कासा पोलिसांनी (Kasa Police) मुंबई-अहमदाबाद महामार्गावर (Mumbai-Ahmedabad Highway) डहाणूजवळच्या चरोटी येथून सुटका केली. सहा जणांच्या एका टोळीने या भावांचे अपहरण केले होते. ज्यामध्ये तीन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश होता. दरम्यान, अपहरण झालेल्या मुलांना घेऊन जाताना या टोळीमध्ये जोरदार भांडण झाले. ज्यामुळे स्थानिक प्रवाशांचे लक्ष वेधून घेतले गेले. त्यातून या मुलांचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना पुढे आली. हे आरोपी या मुलांना गुजरातच्या दिशेने घेऊन निघाले होते.
मुलांच्या अपहरणासाठी मिठाईचे आमिष
अपहरण करून गुजरातच्या दिशेने नेण्यापूर्वी आरोपींनी या दोन शाळकरी मुलांना मिठाईचे आमिष दाखवण्यात आले होते. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास, अपहरणकर्त्यांची गाडी चरोटी येथे एका पुलाखाली उभी असताना अपहरणकर्त्यांमध्ये वाद झाला. या वादाचे पर्यावसण हाणामारीत झाले. या हाणामारी दरम्यान स्थानिक प्रवासी तेथे जमले. त्यातील एका प्रवाशाच्या लक्षात आले की कारच्या आत असलेली आणि घाबरलेली मुले हिंदीमध्ये बोलत आहेत. तर, अपहरणकर्ते मात्र कारबाहेर मराठी भाषेत बोलत आहेत. त्यामुळे प्रवाशांचा संशय वाढला. त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला आणि घटनेची माहिती दिली. प्राप्त माहितीनुसार, कासा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. (हेही वाचा, Viral Video: तरुणाने 25 लाखांसाठी केला स्वतःच्या अपहरणाचा बनाव, व्हिडीओ पाठवत कुटुंबीयांकडून केली पैशांची मागणी)
भेदरलेल्या मुलांना पोलिसांकडून धीर
कासा पोलिसांनी घटनास्थळी हजेरी लावल्यानंतर सुरुवातीला अपहरणकर्त्यांमधील भांडण थांबवले. आरोपींना शांत केले. त्यानंततर त्यांनी मुलांशी संवाद साधला असता ही मुले कल्याणची असल्याचे लक्षात आले. मुले फार भेदरलेली होती. ही घटना घडली त्या दिवशी सकाळीच त्यांचे अपहरण करण्यात आले होते. पण, घाबरलेल्या अवस्थेतही त्यांनी आपल्या घरातील कुटुंबातील सदस्यांचे फोन क्रमांक आठवले आणि पोलिसांना सांगितले. ज्यामुळे पोलिसांना त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचविण्यात यश आले. (हेही वाचा, Mumbai Shocker: लेकीच्या अपहरणाची तक्रार घेऊन आला बाप अन त्याच्याच कूकर्माचा झाला उलगडा; पोटच्या लेकीवर 5 वर्ष करत होता लैंगिक अत्याचार)
दरम्यान, कल्याण येथील महात्मा फुले पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्याची पुष्टी पोलिसांनी केली. आधीच मुलांच्या शोधात असलेले कल्याणचे एक पथक शनिवारी पहाटे मुलांच्या वडिलांसह कासा पोलीस ठाण्यात पोहोचले. हे पथक पोहोचेपर्यंत कासा पोलिसांनी अपहण झालेल्या त्या दोन मुलांच्या आहार आणि थांबण्याची व्यवस्था केली होती. (हेही वाचा, Pune Shocker: अश्लील व्हिडिओ दाखवून स्वतःच्या 11 वर्षीय मुलीवर बलात्कार; आरोपी वडिलाला अटक, पुण्यातील धक्कादायक घटना.)
विनोद गोसावी (29), आकाश गोसावी (28), राहुल गोसावी (27), अंजली गोसावी (28), जयश्री गोसावी (25) आणि चंदा गोसावी (55) हे सर्व आरोपी सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ गावातील एकाच कुटुंबातील आहेत. अपहरणकर्त्यांनी चार तासांच्या प्रवासादरम्यान मुलांना धमकावले होते, ज्यामुळे ते आरडाओरडा करू शकले नाहीत. मुलांना आपले अपहरण झाल्याचे लक्षात येत होते. मात्र, ते घाबरल्याने आणि त्यांना धमकावल्याने ते काही करु शकले नाहीत. केवळ भीतीपोठी गंप्प बसून होते.
दरम्यान, अपहरणकर्त्यांनी कोणत्या कारणासाठी हे अपहरण केले? या आधीही आरोपींचा अशा काही गुन्ह्यांमध्ये सहभाग होता का? याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. गुन्ह्यात वापरलेले वाहन पोलिसांनी जप्त केले असून पुढील तपास सुरू आहे.