Drowning प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

Jalna News: दहिसरमध्ये फिरण्यासाठी गेलेल्या एकाच तरुणाचा मृतदेह आढळून आला तर दुसरा बेपत्ता झाला ही घटना ताजी असताना जाळल्यातून धक्कादायक घटना समोर येत आहे. शेततळ्यात बुडून आई आणि मुलाचा मृत्यू झाला आहे. ऐन होळीच्या सणाच्या दिवशी या घटनेने गावाला हादरवून टाकले आहे. शेतात गेले ते परतले नाही त्यामुळे नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला होता, त्यांनतर त्यांचा शोध घेतला. ही घटना जालाना येथील आहे. (हेही वाचा- मुंबईत माहीमच्या समुद्रात 5 मुलं बुडाली, अग्निशमन दलाकडून शोध सुरु)

मिळालेल्या माहितीनुसार,  समाधान मानिक वानखेडे वय 23 वर्ष आणि सुमित्रा मानिक वानखेडे वय 40 वर्ष अशी मयत दोघांची नावे आहेत.दोघे ही सकाळी शेतात गेले होते. मात्र ते दुपार पर्यंत घरी आले नाही त्यामुळे घरांच्यांनी त्यांचा शोध घेतला. गावात कुठेच सापडले नाहीत. शेत तळ्याजवळ एकाने येऊन पाहीले तेव्हा शेत तळ्यात काही तरी तरांगतांना दिसले. त्यावरून नातेवाईकांनी त्यात शोध घेतला असता दोघांचे मृतदेह त्यात आढळून आले.

घटनेची माहिती कुटुंबियांना देण्यात आली. या घटनेनंतर नातेवाईकांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. दोघांचे मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आहे. जिल्हा रुग्णालयात दोघांचे मृतदेह पाठवण्यात आले. डॉक्टरांनी दोघांना तपासून मृत घोषित केले.या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे.