Accident | (Photo credit: archived, edited, representative image)

Nanded Accident: महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या धडेत चौघांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाले आहे. या घटनेनंतर रस्त्यावर वाहतुक कोंडी झाली होती. एक पोलिस अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, हा अपघात मंगळवारी संध्याकाळी झाला. हा अपघात मुंबईपासून ७०० किमी अंतरावर भोकर म्हैसा रस्त्यावरील पिंपळधव गावाजवळ घडला. (हेही वाचा-  एकविरा देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्यांवर काळाचा घाला, कारच्या अपघातात एकाचा मृत्यू)

मिळालेल्या माहितीनुसार, एका दुचाकीवर तीन लोक प्रवास करत होत तर दुसऱ्या दुचाकीवर दोन जण प्रवास करत होते. दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, एक वाहन अनियंत्रत झाले होते. त्यामुळे हा अपघात घडला. या अपघातात गंगाधर (55), परसराम डेकोर (50), दानेश्वर (25) आणि विनायक (23) अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत, तर 23 वर्षीय श्रावण गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघातात दोन्ही वाहनांचे भरपूर नुकसान झाले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृत गंगाधर आणि परसराम भोकर येथील रहिवासी असून ते जिल्ह्यातील मातुल येखील शाळेत सहाय्यक म्हणून कार्यरत होते. या अपघातानंतर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून या प्रकरणी पुढील तपासणी सुरु आहे.