Navi Mumbai Accident: एकविरा देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्यांवर काळाचा घाला, कारच्या अपघातात एकाचा मृत्यू

एकविरा देवी मंदिरात दर्शन घेऊन घरी परतणाऱ्या एका कारचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. जुना सायन पनवेल महामार्गावर हा अपघात घडला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. सोमवारी पहाटे ६ वाजता हा अपघात झाला.

Navi Mumbai Accident: एकविरा देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्यांवर काळाचा घाला, कारच्या अपघातात एकाचा मृत्यू
Accident | (Photo credit: archived, edited, representative image)

Navi Mumbai Accident: एकविरा देवी मंदिरात दर्शन घेऊन घरी परतणाऱ्या एका कारचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. जुना सायन पनवेल महामार्गावर हा अपघात घडला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. सोमवारी पहाटे 6 वाजता हा अपघात झाला. देवीच्या दर्शनासाठी गेलेले तरुण उरण येथील ओवळे गावातील रहिवासी आहे. (हेही वाचा-  मध्य रेल्वेच्या माटुंगा स्टेशन वर मोटारमॅन च्या सतर्कतेमुळे टळला मोठा अनर्थ (Watch Video)

मिळालेल्या माहितीनुसार, कारचा ताबा सुटल्याने हा अपघाता झाला. कार रस्त्यावर कोसळली, त्यामुळे एकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर रस्त्यावर बराच वेळ गोंधळ निर्माण झाला. अजय विष्णु गिरे असं मृत चालकाचे नाव आहे. अजय हा कार चालवत होता. कारमध्ये गजानन देवकर, निलेश मंजुळकर, सुभाष माळी, ज्ञानेश्वर माळी आणि गोपाळ माळी हे किरकोळ जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती पनवेल पोलिसांना देण्यात आली. या अपघाताची नोंद पनवेल पोलिसांनी घेतली आहे. पोलिसांनी सांगितले की, रविवारी हा ग्रुप एकविरा देवीच्या दर्शनासाठी गेला होता. रविवारी सायंकाळी परतत असताना तळेगाव येथील मित्राच्या घरी थांबला. जुन्या मुंबई पुणे महामार्गावर सकाळी ६ वाजण्याच्या गिरे यांचे वाहनावरिल नियंत्रण सुटले आणि कार पटली. यात कार चालकाचा मृत्यू झाला. स्थानिकांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

(The above story first appeared on LatestLY on Jul 24, 2024 09:49 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).